पुणे

ड्यूरोसॉक्स  कंपनीतील पार्ट चोरणारे कामगारच

CD

सणसवाडी, ता. ८ : येथील ड्यूरोसॉक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून साडेपाच लाख रुपये किमतीचे पार्ट चोरी केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोन कामगार आणि एका ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
अजय कुमार, अखिलेश कुमार (दोघे रा. सणसवाडी, ता. शिरूर) आणि ट्रकचालक अतुल कुमार साकेत (रा. मध्य प्रदेश) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर स्टोअर मॅनेजर सुशील महेंद्र सोनकांबळे (वय ३८, रा. लोणकर नगर, मुंढवा, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडी (ता. शिरूर) येथील ड्यूरोसॉक्स कंपनीत नियमित स्टॉक तपासताना पिस्टन व रॉड असलेल्या तीन लाकडी पेट्या गायब असल्याचे निदर्शनास आले. ‘भांडार व्यवस्थापक’ (स्टोअर मॅनेजर) सुशील सोनकांबळे यांनी ही बाब व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली. कंपनीने अंतर्गत चौकशी केली असता, अजय कुमार याने दोन दिवसांपूर्वी अखिलेश कुमारच्या मदतीने या पेट्या एका ट्रकमध्ये टाकल्याचे समोर आले. ट्रान्सपोर्ट व्यवस्थापकाने संबंधित ट्रक चालकाला कंपनीत आणले असता, त्यानेही दोन्ही कामगारांनी मटेरियल ट्रकमध्ये टाकून बाहेर नेण्यास सांगितल्याची कबुली दिली. पोलिस हवालदार दामोदर होळकर पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur News : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने आज शहर व परिसरातील कलाक्षेत्रावर शोककळा

नाना पाटेकर गेले, पण त्यांनी उभा केलेला ‘तो माणूस’ अजूनही जिवंत! राज ठाकरेंची भावूक पोस्ट

Latest Marathi News Live Update: अजिंठा- अंधारी धरणात पाटबंधारे विभागाची धडक कारवाई

Navratri 2026: ११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरु; नऊ दिवसांच्या व्रतात काय करावे अन् काय टाळावे? जाणून घ्या नियम...

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT