पुणे

नारायणगावात उत्पादकांच्या पदरी निराशा

CD

नारायणगाव, ता. १९ : नारायणगाव बाजारात दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू व शेवंतीच्या फुलांना सोमवारी (ता.१९) मागणी वाढली. मात्र त्या तुलनेत झेंडू फुलांच्या बाजारभावात वाढ न झाल्याने उत्पादकांची निराशा झाली आहे.
गणेशोत्सव काळात प्रतिष्ठापनेच्या दिवसाचा अपवाद वगळता झेंडूच्या फुलांना बाजारभाव मिळाला नाही. मात्र शेवंतीच्या फुलांना प्रतिकिलोग्राम ९० ते १०० रुपये बाजारभाव मिळाला. त्यानंतर बाजारभावात घट झाली. तालुक्यातील नारायणगाव, कुसूर, वडज, येणेरे, निमदरी, गोळेगाव या भागात शेतकऱ्यांनी शेवंती, झेंडूचे मळे फुलवले आहेत. यावर्षी पाणीटंचाईची स्थिती असतानाही मल्चिंग व ठिबकचा वापर करून शेतकऱ्यांनी फुलांचे मळे फुलवले आहेत. गणेशोत्सव काळात समाधानकारक भाव न मिळाल्याने किमान नवरात्र उत्सव काळात झेंडूच्या फुलांना समाधानकारक भाव मिळतील, अशी अपेक्षा फूल उत्पादकांची होती.
दसरा असल्यामुळे झेंडूच्या व शेवंतीच्या फुलांच्या बाजारभावात दहा ते वीस टक्के वाढ झाली. भगवा व पिवळ्या रंगाच्या झेंडूच्या फुलांना रंग व गुणवत्तेनुसार प्रतिकिलोग्राम ३० रुपये ते ५० रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळाला.
दरम्यान, भुलेश्वर (दादर मुंबई) येथील फूल बाजारात झेंडूच्या फुलांना रंग व गुणवत्तेनुसार प्रतिकिलोग्राम ३० रुपये ते ५० रुपयांच्या दरम्यान तर शेवंतीच्या फुलांना प्रतिकिलोग्राम १०० रुपये ते १५० रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळाला. शेवंतीच्या फुलांना समाधानकारक भाव मिळाला, अशी माहिती व्यापारी जगदीश दुराफे यांनी दिली.

व्यापारी तुपाशी शेतकरी उपाशी
गणेशोत्सव काळात व नवरात्र उत्सवात झेंडूच्या फुलांना समाधानकारक बाजारभाव मिळाला नाही. उद्या दसरा असूनही झेंडूच्या फुलांना भाव मिळाला नाही. शेतकऱ्यांकडून आज ३० ते ४० रुपये प्रतिकिलोग्राम या बाजारभावाने खरेदी केलेल्या झेंडूच्या फुलांची विक्री व्यापारी ग्राहकांना शंभर रुपये दराने करत आहेत. यामुळे ''व्यापारी तुपाशी, शेतकरी उपाशी'' अशी अवस्था आहे, असे फूल उत्पादक जितेंद्र भोर यांनी सांगितले.

08781

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Law Courses : विधी अभ्यासक्रमाला मुलींची पसंती; प्रवेशाचे प्रमाण ४३.३८ टक्क्यांवर

IND vs NZ, Schedule: भारताचा T20 संघ न्यूझीलंडला पोहोचला! वैभव सूर्यवंशीसोबत फॅन्सने घेतले सेल्फी, भुवीही कमबॅकसाठी सज्ज

Latest Marathi News Live Update : गोकुळचा निकाल आता फेरमतमोजणीच्या फेऱ्यात, जल्लोषानंतर आकडे बदलले; लेटेस्ट अपडेट वाचा

PMP Bus Depo : पीएमपीच्या बस डेपोत सुधारणा करा; आयुक्तांचे आदेश

Ramdas Athawale : येरवडा म्हाडा कॉलनी पुनर्विकासावर तोडगा काढू; रामदार आठवले यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT