पुणे

दसरा बाजार जोरात

CD

PNE26W60058
सोलापूर ः इलेक्ट्रॉनिक्स दुकानात फ्रीज पाहताना तरुणी.

PNE26W60060
सोलापूर ः वाहनाच्या शोरूममध्ये नवे मॉडेल पाहताना नागरिक.
....
दसऱ्याला बाजारपेठेत ४५० कोटींची उलाढाल शक्य!
ई-व्हेईकल, ऐसपैस फ्लॅट, एआय बेस्ड इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना सोलापूरकरांची पसंती

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १८ : दसऱ्याच्या मुहूर्तावर सोलापूरच्या बाजारपेठेत अंदाजे ४०० ते ४५० कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. रिअल इस्टेट, दुचाकी-चारचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. यंदा इलेक्ट्रिक वाहनांना वाढती पसंती, एआय आधारित स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणी आणि थ्री-फोर बीएचके प्रशस्त फ्लॅटचे आकर्षण ही बाजारपेठेची प्रमुख वैशिष्ट्ये ठरत आहेत. दसरा-दिवाळीनिमित्त जाहीर झालेल्या आकर्षक सवलती आणि मुहूर्तावर खरेदी करण्याच्या परंपरेमुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. आज रविवारच्या सुटीतही वाहनांचे बुकिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली.
दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत वाहने, प्लॉट, फ्लॅट, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि सोने खरेदीसाठी बुकिंगला वेग आला आहे. दसऱ्यापूर्वीच्या रविवारच्या सुटीतही आज बुकिंगसाठी मोठी लगबग दिसून आली. यंदा दुष्काळाचे सावट बाजारपेठेवर असले, तरी प्लॉट, फ्लॅट आणि घरांची खरेदी पूर्वनियोजित असल्याने त्यासाठी कर्जपुरवठ्याचे नियोजन आधीच केले जाते. वाहन खरेदीतही इलेक्ट्रिक दुचाकींचा वाटा वाढत आहे. दसरा-दिवाळीनिमित्त विविध कंपन्यांनी आकर्षक सवलती आणि कर्ज योजनांची घोषणा केल्याने ग्राहकांना खरेदीसाठी प्रोत्साहन मिळत आहे. दुष्काळी परिस्थितीचा परिणाम जाणवण्याची शक्यता असली, तरी या योजनांमुळे दसऱ्याच्या खरेदीत मोठी घट होणार नाही, असा विश्वास व्यापारी आणि व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

चौकट
दसऱ्यानिमित्त उलाढालीचा अंदाज
रिअल इस्टेट (प्लॉट, फ्लॅट व बंगला) : २५० कोटी
टू-व्हीलर अन् फोर-व्हीलर : ६० कोटी
इलेक्ट्रॉनिक्स मार्केट : ५० ते ७५ कोटी
सोने बाजार : ५० कोटी
ई-व्हेईकल : २० कोटी

कोट
यंदा दुचाकींचे चांगले बुकिंग आहे. दसऱ्यानिमित्त ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात बुकिंग केले आहे. बुकिंगच्या तुलनेत वाहनांचा पुरवठा करण्यात अडचण येऊ शकते. आम्ही जादा वाहने मागवत आहोत.
- असिम सिंदगी, सिद्धी सुझुकी, सोलापूर

कोट
यंदा ई-व्हेईकलची बाजारपेठ मोठ्या तेजीत असणार आहे. ई-व्हेईकलचा वाटा सातत्याने वाढत चालला आहे. इंधन बचतीसाठी चांगला पर्याय म्हणून ई-व्हेईकल वापरण्याचे प्रमाण सोलापूरकरांमध्ये वाढले आहे.
- आदेश लुनिया, ई-व्हेईकल विक्रेता

कोट
सोलापूरकरांचा प्रशस्त राहण्याचा मूळ ट्रेंड आता फ्लॅट संस्कृतीकडे वळू लागला आहे. थ्री बीएचके व फोर बीएचके फ्लॅटची मागणी यंदा वाढली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर हा बदल अधिक दिसून येत आहे.
- अभिनव साळुंखे, अध्यक्ष, क्रेडाई, सोलापूर शाखा

कोट
यंदा दसऱ्यानिमित्त ‘एआय’ बेस्ड इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मोठी मागणी आहे. मोबाईल, एसी, फ्रीज व स्मार्ट टीव्ही हे ‘एआय’मुळे अधिक स्मार्ट बनले आहेत. एसीची मागणीही वाढली आहे. यंदा दसऱ्याची खरेदी चांगलीच असणार आहे.
- सूयोग कालानी, खजिनदार, सेडा, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Shroff shooting incident : टायगरला फोन करून समजावलं होतं, पण...; बिश्नोई गँगनं घेतली हल्ल्याची जबाबदारी

CEC Gyanesh Kumar Row : देशातील संघर्ष आता आंतरराष्ट्रीय स्तरावर! लंडनमधून ध्रुव राठीचा थेट हल्लाबोल, म्हणाला...

Marathwada Graduate Election 2026: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट! ४० हून अधिक आजी-माजी आमदार, खासदार मतदानापासून वंचित?

Solapur Politics : ऐन मतदानाच्या तोंडावर शरद पवारांना सर्वात मोठा धक्का; सोलापुरातील ३ आमदारांचा थेट भाजपला पाठिंबा, नेमकं काय घडलं?

Video: टायगर श्रॉफवर गोळीबार; दुचाकीवरून आले तीन हल्लेखोर,धक्कादायक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT