Viral Video Sakal
पुणे

पुण्यातील धक्कादायक घटना! ख्रिश्चन प्रार्थना केल्यामुळे DY पाटील कॉलेजच्या प्राचार्यांना मारहाण | Video Viral

या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दत्ता लवांडे

पुणे : पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कॉलेजमध्ये ख्रिश्चन समाजाची प्रार्थना घेतली जात असल्यामुळे महाविद्यालयातील प्राचार्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील तळेगाव आंबी येथे डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेचे महाविद्यालय आणि विद्यालय आहे. या महाविद्यालयातील लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे का लावले? आणि ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना का घेतल्या जातात? हे दोन्ही आरोप करून प्राचार्य अलेक्झांडर यांन मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये त्यांचे कपडे फाटल्याचं दिसत आहे. हा प्रकार लवकर थांबवा आणि प्राचार्यांची बदली करा अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, ही घटना घडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर तहसीलदाराने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याच्या प्रकरणाचा अहवाल अजून प्रलंबित असताना ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनेवरून हा वाद झाला आहे. महाविद्यालय प्रशासनाने मात्र याबद्दल मौन बाळगलं आहे.

"इथे मुलांना संस्कार मिळतील या हेतून आम्ही मुलांना शाळेत घालतो पण या ठिकाणी जर फक्त ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना घेतल्या जात असतील तर हे चुकीचे आहे. जोपर्यत या प्राचार्यांची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही." असा इशारा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT