e-bike sakal
पुणे

पुण्यात सहा महिन्यात मिळणार भाड्याने इ-बाईक

पुणे महापालिकेने वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक, सीएनजी वाहनांसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

ब्रिजमोहन पाटील @brizpatil

पुणे महापालिकेने वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक, सीएनजी वाहनांसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

पुणे - इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असताना आता गेली अनेक महिने इ बाईक भाड्याने देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये प्रलंबित होता. अखेर आज स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. पूर्वी ५०० ठिकाणांवर इ बाईक स्टेशन केले जाणार होते. पण पहिल्या टप्प्यात २५० स्टेशन उभारणीस मान्यता देण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यात यासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा निर्माण करून पुणेकरांच्या सेवेत ही इ बाईक सेवा येणार आहे.

पुणे महापालिकेने वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक, सीएनजी वाहनांसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. पीमपीच्या ताफ्यातून डिझेल बसेस हद्दपार करण्यात आले आहेत. पुणे शहरात नागरिकांनी पेट्रोल, डिझेलवरील वाहने कमी वापरावेत शहरात फिरण्यासाठी इ बाईक भाड्याने देण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. यासाठी महापालिकेला सर्वाधिक फायदा व नागरिकांना कमी दरात सेवा देऊ शकणाऱ्या व्हिट्रो कंपनीचा प्रस्ताव मार्च २०२२ मध्ये स्थायी समितीपुढे सादर करण्यात आला होता. यामध्ये ७८० जागी चार्जिंग स्टेशन उभारणे, त्याठिकाणी जाहिरात करण्याचे हक्कही या कंपनीला दिले देणे. त्यासाठी आकाशचिन्ह विभागातर्फे वर्षाला २२२ चौरस मीटर इतके शुक्ल आकारले जाणार आहे.

ही कंपनी प्रत्येक जागेसाठी वर्षाला सुमारे १ लाख रुपये भाडे, तसेच सर्व स्टेशनसाठी लमसम रक्कम तीन लाख आणि एकूण नफ्याच्या २ टक्के नफा महापालिकेला दिला जाणार आहे. या जागा पुढील ३० वर्षासाठी दिली जावी असा प्रस्ताव स्थायी समितीला सादर करण्यात आला. पहिल्या टप्प्यात ७८० जागांपैकी ५०० जागा कंपनीला द्याव्यात, त्यापैकी २०० ठिकाणीच चार्जिंग स्टेशन जातील, असा दावा प्रशासनातर्फे केला करण्यात आला होता. हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडल्यानंतर नगरसेवकांनी विरोध केला होता. त्यानंतर महापालिकेवर प्रशासक आल्यानंतरही त्यावर लगेच निर्णय झालेला नाही.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘शहरात इ बाईक भाड्याने देण्यासाठीचा प्रस्ताव मान्य केला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात २५० ठिकाणी या बाईक भाड्याने मिळतील. तेथेच चार्जिंग स्टेशनची सुविधा असणार आहे. कंपनीकडून ५०० जागांची मागणी केली होती, पण ती अद्याप मान्य केलेली नाही. पुढील सहा महिन्यात कंपनीकडून सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील त्यानंतर ही सेवा पुणेकरांना उपलब्ध होईल.

बुलेट

- प्रत्येक किलोमीटरसाठी १ रुपये ६० रुपये भाडे

- २५० ठिकाणी चार्जिंग स्टेशन व पार्किंग

- वाहतुकीला व पादचारी मार्गाला अडथळा होणार नाही यापद्धतीने स्टेशनची निर्मिती

- नागरिकांना कोणत्याही स्टेशनवरून वाहन घेता येणार व सोडता येणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT