पुणे

कऱ्हाड रस्त्यांची कामांच्या ई-निविदांसाठी अल्प मुदतीची संजीवनी

CD

रस्ता कामांच्या ई-निविदांसाठी अल्प मुदत

रस्त्यांसाठी संजीवनी; प्रक्रियेतील लालफितीचा कारभार संपणार

कऱ्हाड, ता. १६ ः प्रशासकीय लालफितीत अडकलेल्या गावोगावचे रस्ते आणि विकासकामांच्या निविदा प्रक्रिया दिरंगाईमुळे रखडल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्या कामांना गती देण्यासाठी ग्रामविकास विभागाने ई-निविदा सूचनेचा कालावधी कमी केला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत अल्प कालावधी निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्याला विशेष सवलत दिली आहे. त्यामुळे रखडलेल्या व कागदावर अडकलेल्या रस्त्यांच्या कामाला गती मिळणार आहे.
निविदा प्रक्रियेच्या प्रदीर्घ कालावधीमुळे कामांना विलंब होत होता. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास कालावधी वाढत होता. त्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेही होती. मात्र, त्या टप्पा तीन व चारमधील महत्त्वाच्या कामांना ३० सप्टेंबरपूर्वी कार्यारंभ आदेश देण्याचे केंद्र शासनाने बंधनकारक केले. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निधी वेळेत वापरला जावा, ग्रामीण भागाचा संपर्क अधिक सक्षम व्हावा, यासाठी शासनाने कामातील तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या निविदांचा कालावधी कमी केला. त्या संदर्भात ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रशांत पाटील यांनी आदेश दिले आहेत. जिल्हा परिषद आणि ग्रामीण रस्ते विकास यंत्रणेतर्फे होणाऱ्या लहान-मोठ्या कामांच्या निविदा प्रक्रिया अवघ्या काही दिवसांत होणार आहेत. पावसाळ्यानंतर ग्रामीण भागात रस्त्यांच्या दुरुस्ती व सिमेंट, डांबरीकरणाच्या कामांना वेग येतो. निविदेचा कालावधी कमी झाल्याने कंत्राटदारांच्या निवडीही वेळेत पूर्ण होतील. त्यानंतर प्रत्यक्ष रस्त्यांची कामेही तत्काळ सुरू होण्याची अपेक्षा आहे.

.............
चौकट

निविदांचा कालावधी

कामाची मर्यादा - प्रथम प्रसिद्धी - द्वितीय प्रसिद्धी - तृतीय प्रसिद्धी
१० लाख ते दीड कोटी - आठ दिवस - चार दिवस - तीन दिवस
दीड कोटी ते २५ कोटी - आठ दिवस - चार दिवस - तीन दिवस
२५ कोटी ते १०० कोटी - १५ दिवस - सात दिवस - तीन दिवस
१०० कोटींपेक्षा जास्त - २१ दिवस - ११ दिवस - तीन दिवस

........................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Fee: 'यूपीआय'वरील शुल्कावरुन होणाऱ्या आरोपांना सरकारचं स्पष्टीकरण; 95 टक्के व्यवहार मोफतच...

Prataprao Pawar : कृषी, शिक्षणातील समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

Harry Brook Record: इंग्लंडच्या कर्णधार हॅरी ब्रूकने रचला इतिहास, T20 वर्ल्ड कप विजेत्या कर्णधार रोहित शर्मालाही हे जमलं नाही

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT