पुणे

‘ई-२०’ इंधनामुळे पाणी, अन्नसुरक्षेला धोका

CD

पान २
------
‘ई-२०’ इंधनामुळे
पाणी, अन्नसुरक्षेला धोका

जयराम रमेश : ऊस, तांदूळ, मका वापराबाबत आक्षेप

ॲग्रोवन वृत्तसेवा
नवी दिल्ली : देशभरात ई-२० (२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. इथेनॉल निर्मितीसाठी प्रामुख्याने ऊस, तांदूळ आणि मका यांसारख्या पिकांचा वापर होत असल्याने जलसंपत्तीवर ताण वाढण्याबरोबरच अन्नसुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य जयराम रमेश यांनी गुरुवारी केला.
रमेश यांनी सामाजिक माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे, की ई-२० धोरणामुळे कच्च्या तेलावरील आयात कमी होण्यास आणि स्वच्छ ऊर्जेला चालना मिळण्यास मदत होईल, असा सरकारचा दावा असला तरी या धोरणाच्या पर्यावरणीय परिणामांचे सर्वंकष मूल्यमापन होणे आवश्यक आहे. भारतात इथेनॉल उत्पादनासाठी ऊस, तांदूळ आणि मका या पाण्याचा जास्त वापर करणाऱ्या पिकांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. त्यामुळे जलस्रोतांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो.
ऊस आणि भात ही पिके देशातील सिंचनाच्या पाण्यापैकी सुमारे ७० टक्के पाणी वापरत असल्याचा दावा करताना त्यांनी एका लिटर ऊसाधारित इथेनॉलसाठी सुमारे ३,६३० लिटर, तांदूळाधारित इथेनॉलसाठी १०,७९० लिटर आणि मक्याधारित इथेनॉलसाठी ४,६७० लिटर पाण्याची आवश्यकता भासत असल्याचे नमूद केले.
दरम्यान, केंद्र सरकार इथेनॉल निर्मितीसाठी तांदूळ अनुदानित दराने उपलब्ध करून देत असल्याचाही आरोप रमेश यांनी केला आहे. तथापि, या आरोपांवर केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

‘शाश्वत पर्यायांचा
विचार करण्याची गरज’
देशातील अनेक भागांत भूजल पातळी घटत असताना इथेनॉल निर्मितीसाठी अधिक शाश्वत पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे. नीती आयोगाने २०२१ च्या इथेनॉल रोडमॅपमध्ये कृषी अवशेष आणि जैविक कचऱ्यापासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याची शिफारस केली होती, त्याकडेही जयराम रमेश यांनी लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता CJP ची नवी लढाई; अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा, नेमका काय प्लॅन? सरकारचं टेन्शन वाढणार?

भारतीय संघाच्या फिटनेसवर BCCI चा 'सर्जिकल स्ट्राईक'! सीनियर-ज्युनियर पाहू नका, सर्वांना एकच नियम... वाचा BCCI Fitness Standards

Maharashtra Politics: कल्याण-डोंबिवलीतील राजकीय समीकरण पालटले! शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, एकनाथ शिंदेंना धक्का

Drug Disposal Pune : ड्रग माफियांना मोठा झटका ! पुणे अन् धुळ्यात मोठी कारवाई; ९,५३६ किलो अमली पदार्थांचा साठा नष्ट, मोठे रॅकेट उघड

राजपाल यादवने बँकेकडून सुद्धा घेतलेलं १६ कोटींचं कर्ज, ते पण फेडलं नाही? आता घराचा होणार लिलाव

SCROLL FOR NEXT