Earthquake Esakal
पुणे

Earthquake In Maharashtra : पहाटे पहाटे राज्यात बसले भुकंपाचे धक्के !

Earthquake In Maharashtra : २,३,४,५ व ६ च्या दरम्यान बसले भूकंपाचे धक्के !

चंद्रकांत घोडेकर ः सकाळ वृत्तसेवा

Earthquake In Maharashtra : आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव ,चिंचोली येथे पहाटेच्या सुमारास भूकंपाचे पाच धक्के बसल्याचे पहायला मिळाले. चिंचोली येथील स्थानिक नागरीक धक्के बसल डले त्यांना पाच भूकंपाचे धक्के बसल्याचे सावता झोडगे आणि आनंद कोकने यांनी सांगितले.

पहाटे २,३,४,५ व ६ च्या दरम्यान भूकंप झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घोडेगाव शहरामध्ये तीन ते सहाच्या दरम्यान तीन वेळा भूकंपाचे धक्के बसले. अशी माहिती सतीश काळे यांनी दिली . येथे घोडेगाव जवळील वाड्या परांडा व सालोबा मळा येथेही भूकंपाचे जोरदार धक्का बसले आहेत.

परांडा मध्ये चार ते सहाच्या दरम्यान तीन वेळा भूकंपाचे जोरदार धक्का बसले असल्याचे सुरजन काळे या तरुणाने सांगितले. तर सालोबा मळा येथे पाच वेळा भूकंपाचे हादरे बसले. चिंचोली व सालोबा मळा येथे ग्रामस्थ पहाटे दोन ते सहा वाजेपर्यंत घराच्या बाहेरच होते. नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

सालोबा मळा येथे पंधरा दिवसांपूर्वीच असाच एक भूकंपाचा धक्का बसल्याचे गणेश घोडेकर यांनी सांगितले. याबाबत तहसीलदार संजय नागटिळक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेऊन सांगतो असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT