पुणे

शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींनी वेधले लक्ष; पंढरपूरच्या माधवी कुलकर्णी यांनी हस्तकलेतून साकारल्या गणेश मूर्ती

CD

PNE26W45519, PNE26W45518
पंढरपूर ः माधवी कुलकर्णी यांनी हस्तकलेतून साकारलेल्या गणेश मूर्ती.

माधवीच्या हातून साकारतोय पर्यावरणपूरक गणराया
शाडू मातीच्या सुबक मूर्तींना यंदा मोठी मागणी; अडीचशेहून अधिक मूर्तींची निर्मिती

भारत नागणे : सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. २८ : गणेशोत्सव जवळ आला की बाजारात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींची गर्दी होते. मात्र, रासायनिक रंग आणि पीओपीमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी पंढरपूर येथील माधवी कुलकर्णी या तरुणीने शाडू माती, नैसर्गिक रंग आणि वनस्पतीजन्य रंगांचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या सुबक आणि कलात्मक मूर्तींना यंदा मोठी मागणी आहे.

लहानपणापासूनच हस्तकलेची आवड असलेल्या माधवी यांनी कोरोना काळात छंद म्हणून गणेशमूर्ती तयार करण्यास सुरुवात केली. ६ इंचांपासून ते १ फुटापर्यंतच्या विविध आकारातील मूर्ती त्या तयार करतात. प्रत्येक मूर्ती हाताने घडविल्याने तिला वेगळे कलात्मक रूप मिळते.
‘पीओपीच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे नद्या-तलाव प्रदूषित होतात. शाडू मातीची मूर्ती २० मिनिटांत पाण्यात विरघळते आणि त्यातून झाडांनाही खत मिळते. म्हणून मी ही कला निवडली,’ असे माधवी यांनी सांगितले.
त्यांनी तयार केलेल्या मूर्तींना शाळा, सोसायट्या आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून मागणी होत असून, थेट बुकिंग केले जात आहे. सातशे रुपयांपासून दीड हजार रुपयांपर्यंत गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. आतापर्यंत त्यांनी अडीचशे ते तीनशे गणेशमूर्ती तयार केल्या आहेत.
हाताने घडविलेल्या सुबक मूर्ती, नैसर्गिक रंगांचा वापर आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यामुळे माधवी यांच्या मूर्तींना वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. व्यवसायाबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा हेतू असल्याचे सांगत, प्रत्येकाने यंदा पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचीच स्थापना करावी, असे आवाहन माधवी कुलकर्णी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कॅफेबाहेर खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला अटक

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT