Eco-Friendly-Ganpati 
पुणे

स्वत:च तयार करा ‘इको फ्रेंडली बाप्पा’

सकाळवृत्तसेवा

पुणे - आपल्या लाडक्‍या बाप्पाची मूर्ती स्वत:च्या हाताने तयार करण्याची व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविण्याची संधी देणारी अभिनव कार्यशाळा ‘सकाळ’ने ९ सप्टेंबर रोजी आयोजित केली आहे.

फिनिक्‍स मार्केटसिटी (विमाननगर), पाठशाळा (बाणेर व रहाटणी), क्‍लारा ग्लोबल स्कूल (हडपसर), नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल (चिंचवड), पुणे सेंट्रल मॉल (कर्वे रोड व विद्यापीठ रोड), सिटी प्राइड स्कूल (निगडी), मॅक्‍स स्टोअर (औंध), अभिषेक इंटरनॅशनल स्कूल (मोशी), सीएम इंटरनॅशनल स्कूल (बालेवाडी), सिटी वर्ल्ड स्कूल (सिंहगड रोड) आणि संस्कृती नॅशनल स्कूल (धायरी) येथे ही कार्यशाळा होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी चौकटीत दिलेल्या केंद्रांवर नोंदणी आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांनी येताना बसण्यासाठी मॅट, कंपास पेटी, पाण्याची बाटली, छोटा रुमाल, जुने वर्तमानपत्र, पेंटिंगचा ब्रश, बाउल व तिकीट सोबत आणावे. कार्यशाळेच्या ठिकाणी शाडू माती देणार असून, तयार केलेल्या मूर्ती घरी नेता येतील. सहभागींना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.  फिनिक्‍स मार्केटसिटी, क्‍लारा ग्लोबल स्कूल, मॅक्‍स फॅशन, सेंट्रल मॉल आणि सिटी वर्ल्ड स्कूल हे या कार्यशाळेचे प्रायोजक आहेत. 

सोमवारपासून (ता. २७) नोंदणी सुरू होत असून, ५ सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे. रविवारी शाळेत नोंदणी होणार नाही.

नोंदणीची ठिकाणे आणि वेळ -
फिनिक्‍स मार्केट सिटी, विमाननगर (दु. १२ ते रा .९), पाठशाळा, बाणेर (दु. १२ ते ४ ), रहाटणी (स. १० ते दु. २ ), क्‍लारा ग्लोबल स्कूल (स. १० ते दु. ३), नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल (स. १० ते दु. ४), पुणे सेंट्रल मॉल-कर्वे रोड, विद्यापीठ रोड (दु. १ ते रा. ८), सिटी प्राइड स्कूल (स. १० ते दु. २), मॅक्‍स स्टोअर, औंध (दु.१२ ते रा. ८), अभिषेक इंटरनॅशनल स्कूल (स. ९ ते दु. २), सीएम इंटरनॅशनल स्कूल (दु. १२ ते ४), सिटी वर्ल्ड स्कूल, सिंहगड रोड (स. ९ ते दु. ३), संस्कृती नॅशनल स्कूल (स. ९ ते दु. १). 
महत्त्वाचे...  नावनोंदणी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊनच करावी; फोनवर नोंदणी करता येणार नाही.

‘सकाळ’ इको गणपती २०१८
 कधी : ९ सप्टेंबर २०१८
 वेळ : सकाळी १० ते ११.३० 
 शुल्क ः प्रत्येकी  ५० रुपये 
 प्रवेश : सर्व वयोगटासाठी
 संपर्क : ८८०५००९३९५ किंवा ९५५२५३३७१३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Dalit discrimination : देशात अद्यापही दलितांसोबत भेदभाव; चहाच्या टपरीवर दोन प्रकारचे कप : राहुल गांधी

Mumbai Crime: मुंबई-नाशिक महामार्गावर दरोडेखोरांचा थरार, पोलिसाकडूनच ६१ लाखांची लूट, पाच जणांना अटक

Manoj Jarange Maratha Reservation : 'निर्णय झाला नाही तर मुंबईला येणार'; मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीत बारावे आमरण उपोषण सुरू, सरकारला दिला थेट इशारा

Maharashtra Monsoon Prediction : नेपाळच्या पूरस्थितीत अडकलेले संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप भारतात परतले

जीएसटी माफ करण्यासाठी दीड कोटींची मागणी, 40 लाखांची लाच घेताना CGSTचे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षकासह तिघांना अटक

SCROLL FOR NEXT