पुणे

चैतन्य विद्यालयात पर्यावरणपूरक रंगपंचमी

CD

ओतूर, ता. ७ ः ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्राम विकास मंडळ संचलित चैतन्य विद्यालयामध्ये इको फ्रेंडली रंगपंचमी साजरी करण्यांसाठी नैसर्गिक रंग कसे तयार करावेत, याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले.
विद्यार्थ्यांना रंगपंचमी साजरी करत असताना बाजारातील रासायनिक रंगांच्या वापरामुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि पर्यावरणातील घटकांचा वापर करून तयार केलेल्या रंगामुळे होणारे फायदे याबाबत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हरित सेनेचे संतोष कांबळे यांनी मार्गदर्शन केले. बाजारातील काळा, निळा, हिरवा, लाल, चांदीसारखा निळा या रंगांचा वापर केला जातो. या रंगांमध्ये ऑक्साईड, कॉपर सल्फेट, मर्क्युरीक सल्फाईट, पर्शियन नीळ, ॲल्युमिनियम ब्रोमाईड यारखे रासायनिक घटक असतात. यामुळे मानवी शरीरावर घातक परिणाम होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंग तयार करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली रंगपंचमी साजरी करण्याची शपथ घेतली.
याप्रसंगी ग्राम विकास मंडळ ओतूरचे उपाध्यक्ष प्रभाकर तांबे, मुख्याध्यापिका राजश्री भालेकर, राजेंद्र डुंबरे, रघुनाथ तांबे, सचिव प्रदीप गाढवे, पंकज घोलप, नितीन तांबे, राजश्री भालेकर, संजय हिरे, अजित डांगे, संतोष कांबळे, लक्ष्मण दुडे व विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

01672

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage India : देशात गॅसचे संकट आणखी तीव्र ! सौदी अरेबियातील 'या' मोठ्या कंपनीने बंद केला एलपीजी पुरवठा, धक्कादायक कारण समोर

Pune-Varanasi Train: पुणेकरांचे काशीदर्शन झाले सोपे! आता हडपसर वरून थेट वाराणसीला 'अमृत भारत' ट्रेन, PM मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

Heart Health: वन बॉडी वन हार्ट : जीवनशैली, ताण, चयापचय आरोग्य आणि लवकर तपासणी एकत्रितपणे तुमचा हृदयाचा धोका कसा ठरवतात?

Latest Marathi News Live Update: शब्दाचा पक्का म्हणून एकनाथ शिंदेंची ओळख- कडू

दहशतवादी संघटनेशी तुमचं कनेक्शन सापडंलय...NIA च्या नावाने डिजिटल अरेस्ट; वृद्धाची 9.5 लाखांची फसवणूक, कसं सुरक्षित राहायचं पाहा

SCROLL FOR NEXT