नागठाणे महाविद्यालयात
भित्तिपत्रकाचे प्रकाशन
नागठाणे, ता. ३० : येथील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचा वनस्पतिशास्त्र विभाग व निसर्ग मंडळातर्फे इको- टुरिझम (पर्यावरणपूरक पर्यटन) विषयावरील भित्तिपत्रकाचे प्रकाशन उत्साहात झाले. शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य डॉ. शाहीन पटेल, प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, प्रा. अभय जायभाये, डॉ. अजितकुमार जाधव, डॉ. सुरेश पाटील, डॉ. नागनाथ चोबे, प्रा. संतोष निलाखे, प्रा. ए. डी. पाटील, प्रा. सुंदर कांबळे, प्रा. अभिलाषा देशमुख आदींची उपस्थिती होती. आदित्य पाटील, अनिकेत वाघमारे यांनी निर्मितीसाठी परिश्रम घेतले. प्रा. पूजा कदम यांनी सूत्रसंचालन केले. रसिका मोहिते यांनी आभार मानले.