ED raids propertiesof ncp Hasan Mushrif pune politics sakal
पुणे

Pune News : ईडीकडून माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर छापे

मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील मालमत्तांवर ईडीने बुधवारी सकाळी एकाचवेळी ही कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील मालमत्तांवर सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी छापे टाकले. मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील मालमत्तांवर ईडीने बुधवारी सकाळी एकाचवेळी ही कारवाई केली.

मुश्रीफ यांच्या पुण्यातील कोरेगाव पार्क आणि बंडगार्डन येथील मालमत्तांवर छापे टाकून कागदपत्रांची तपासणी केली. तसेच, कोंढवा भागात मुश्रीफ यांचे नातेवाईक राहायला आहेत. तेथील अशोका मुज सोसायटीतही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ईडीच्या या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने ही कारवाई राजकीय द्वेषातून करण्यात आल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या कारवाईमुळे मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे समजते. मात्र, मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT