Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray e sakal
पुणे

ED : ज्यांचे कनेक्शन असेल त्यांची चौकशी सुरु असेल; मुंबईतील छापेमारीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

पुणे : “मुंबई महापालिकेमध्ये कोविड सेंटर्स सुरू करण्यात आले. त्यानंतर कोविड सेंटरमधील घोटाळा बाहेर आला, त्यावेळी अतिशय धक्कादायक माहिती बाहेर आली होती. ज्या लोकांचे कनेक्शन असतील त्यांची चौकशी सुरू असेल. यासंदर्भातील अधिकृत माहिती ईडी अधिकारीच देऊ शकतील.” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ईडीने मुंबईत छापेमारी केल्याने त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. फडणवीस हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी लोहगाव विमानतळ येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या छापेमारीबाबत भूमिका स्पष्ट केली.

फडणवीस म्हणाले, ईडीने नेमकी काय कारवाई सुरू आहे हे मला माहिती नाही. पण मुंबई महापालिकेमध्ये कोविड सेंटर्स सुरू करताना कोणताही अनुभव नसताना अशा कंपन्या तयार झाल्या. त्यांनी लोकांच्या जिवाशी अक्षरशः खेळ केला. यामध्ये पुण्यात एका पत्रकाराचा मृत्यूही झाला आहे.

कोविड सेंटरमधील घोटाळा बाहेर आल्याने त्यातून अतिशय धक्कादायक माहिती बाहेर आली होती. ही चौकशी कुठपर्यंत पोहोचली, या छाप्यात काय मिळालं आहे हे ईडी सांगू शकेल. मला माहिती नाही. पण ज्यांचे या प्रकरणात कनेक्शन आहे, त्यांच्यावर ईडी कारवाई करेल. याचा तपशील ईडीच्याच अधिकाऱ्यांकडे आहे, असेही फडणवीस म्हणाले.

कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीयांच्या १५ ठिकाणींवर छापेमारी केली आहे. त्यामुळे राजकारण तापलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT