Education minister promises to address the issue of old pension by discussing it with finance ministers Says MLA Sawant 
पुणे

जुन्या पेन्शनचा प्रश्न अर्थमंत्र्यांशी चर्चा करून मार्गी लावण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या जुन्या निवृत्ती वेतनाचा प्रश्न राज्याचे अर्थमंत्री आणि अर्थसचिव यांच्याशी चर्चा करून मार्गी लावण्याचे आश्वासन राज्याचे नूतन शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्याची माहिती आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिली आहे. 

एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या विना अनुदानित शाळा मधील शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना मिळावी यासाठी सेवाग्राम वर्धा ते विधानभवन नागपूर पायी दिंडी पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. पायी दिंडी रविवारी नागपूर येथे पोहचली असताना येथील आमदार निवास मधील आर्यभट्ट सभागृहांमध्ये शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट देऊन शिक्षक आमदार व शिक्षकांशी चर्चा केली.

घरातच त्याने थाटली गांजा लॅब; पाहून पोलिसही चक्रावले

पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भातील शिक्षणमंत्र्यांना माहिती  दिली, २००५ पूर्वी नियुक्त राज्यातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना दिली असताना ६० हजार शिक्षक-शिक्षकेतर बांधवांना तेवढं केवळ १०० टक्के अनुदान नसल्याने अद्याप दिली नाही ही बाब शिक्षणमंत्री थोरात यांच्या निदर्शनास आणून दिली आणि लवकरच त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी केली.

मला खून करायचा नव्हता; पण

यावेळी नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सुधीर तांबे, शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर, अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील, नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे  आदीसह शाळा कृती समितीचे समाधान घाडगे, कल्याण बर्डे, प्रसाद गायकवाड, सचिन नलवडे, विजय येवले, मारुती गायकवाड, शंकर वडणे, संतोष गायकवाड, अमोल कुलकर्णी, पप्पू देशमुख, मुकुंद मोहिते, राजेंद्र आसबे, कुंडलिक पवार, राजेश पवार, राजेंद्र माळी, अनंत गर्जे आदी उपस्थित होते.

सभागृहात ही धारेवर धरू 
विधान परिषद सभागृहात सर्व शिक्षक व पदवीधर आमदार जुन्या पेन्शनचा प्रश्न आक्रमकपणे मांडू, प्रसंगी शासनाला धारेवर धरू व साठ हजार शिक्षकांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन आ. दत्तात्रय सावंत यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Priya Nair: 92 वर्षांत पहिल्यांदाच महिला CEOची निवड; HULच्या नेतृत्वाची जबाबदारी प्रिया नायर यांच्यावर

Video: दिल्ली पुन्हा 100 वर्ष मागे गेल्यासारखी दुरवस्था! पावसानंतरचा व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला लावाल हात

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

SCROLL FOR NEXT