Student-Stress 
पुणे

कोरोनामुळे पुण्यातील महाविद्यालये पुन्हा बंद होणार? वाचा काय म्हणाले शिक्षण मंत्री

ब्रिजमोहन पाटील

पुणे - महाविद्यालये सुरू करण्यासाठी जेव्हा परवानगी दिली तेव्हा आणि आता यामध्ये बराच फरक पडला आहे. सध्या कोरोनाचा रुग्ण वाढत असल्याने सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. स्थानिक परिस्थितीचा विचार करून महाविद्यालये सुरू करण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. आता महाविद्यालये सुरू झाली असली तरी कोरोनाचा संसर्ग वाढल्यास महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय संबंधित विद्यापीठाचे कुलगुरू आणि जिल्हाधिकारी यांनी एकत्रित चर्चा करून घ्यावा, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाचे उपकेंद्र व कुलगुरू कालिदास संस्कृत विश्‍वविद्यालयाचे उपकेंद्र पुणे, नांदेड, औरंगाबाद आणि रत्नागिरी येथे स्थापन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठाचे दोहा कतार येथे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या करारास राज्य सरकारतर्फे मान्यता देण्यात आला आहे. व्हीआयटीतील प्रवेशातील गोंधळाबाबत पुढील आठ दिवसात चौकशी अहवाल तंत्र शिक्षणचे संचालक डॉ. अभय वाघ यांच्याकडून सादर होईल त्यानंतर कारवाई केली जाईल,’ असेही सामंत यांनी सांगितले.राज्यातील रिक्त २६० प्राचार्यांची पदे भरण्याची मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर उर्वरित रिक्त पदांची भरती करण्यासही मान्यता दिली जाईल. प्राध्यापक भरती संदर्भात सध्याच्या स्थितीत किती पदे रिक्‍त आहेत, त्याचा आढावा घेण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाला दिले आहेत. सावित्रीबाई फुले यांचे स्मारक पुणे विद्यापीठात उभारण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी विद्यापीठाने प्रस्ताव पाठवावा त्यास मान्यता दिली जाईल, असे सामंत यांनी सांगितले.

पुणे विद्यापीठाची होणार पंचायत?
पुणे विद्यापीठाने प्रथम सत्र परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण उदय सामंत यांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून परीक्षा देण्याचा पर्याय राहील, अशी घोषणा उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे आता पुणे विद्यापीठाची यावरून पंचायत होण्याची शक्यता आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: अहिल्यानगरमध्ये मोठा अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल झाले, ९ वाहनांना धडक दिली अन्...; भीषण घटना

Paralysis Warning Signs : पॅरालिसिसचा झटका येण्याआधी शरीरात दिसतात 'हे' 2 बदल; चुकूनही करू नका दुर्लक्ष, नाहीतर जीव गमवाल

Pooja Khedkar: पुजा खेडकर कुटुंबाचा नवा वाद! नवी मुंबईतील अपहरणकर्ता पुण्यातील घरी आढळला, पोलिसांचा तपास सुरू...

Latest Marathi News Updates: ठाकरे गटाच्या खासदारांनी धाराशिव येथे पाकिस्तानचे झेंडे फडकवले - चंद्रशेखर बावनकुळे

Dhule News : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे बोगस डॉक्टरांवर कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT