education news 4 lakh seats available for online admission of 11th pune  sakal
पुणे

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी तब्बल पावणे चार लाख जागा उपलब्ध

राज्यात इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जवळपास एक हजार ६४२ कनिष्ठ महाविद्यालयांमधून तब्बल तीन लाख ८२ हजार ७०१ जागा उपलब्ध झाल्या

- मीनाक्षी गुरव

पुणे : राज्यात इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जवळपास एक हजार ६४२ कनिष्ठ महाविद्यालयांमधून तब्बल तीन लाख ८२ हजार ७०१ जागा उपलब्ध झाल्या आहेत. या प्रवेश प्रक्रियेसाठी आतापर्यंत चार लाख ३० हजार ५४४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नागपूर, नाशिक आणि अमरावती महापालिका क्षेत्रात केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत एकूण प्रवेशासाठी उपलब्ध जागा, कॅप फेरीअंतर्गत प्रवेशाच्या जागा, रिक्त जागा, कोट्यांतर्गत प्रवेशाच्या जागा याबाबत तपशील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. त्यानुसार पुण्यात  ३०९ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. त्याद्वारे एकूण एक लाख सहा हजार १४० जागा उपलब्ध झाल्या असून त्यातील ८१ हजार ६९९ जागा या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत उपलब्ध आहेत.

अकरावीच्या प्रवेशासाठी उपलब्ध जागांचा तपशील

महापालिका क्षेत्र : महाविद्यालयांची संख्या : एकूण प्रवेश क्षमता : ‘कॅप’अंतर्गत प्रवेश क्षमता

मुंबई : १,०११ : ३,७०,४७५ : २,३०,००२

पुणे : ३०९ : १,०६,१४० : ८१,६९९

नागपूर : १९४ : ५२,०६० : ३७,१८४

नाशिक : ६३ : २६,४८० : २२,०७६

अमरावती : ६५ : १६,१९० : ११,७४०

आतापर्यंत झालेल्या ऑनलाइन नोंदणी

महापालिका क्षेत्र : ऑनलाइन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या

मुंबई : २,७४,६२७

पुणे : ८९,८६०

नागपूर : ३०,८९५

नाशिक : २४,८३०

अमरावती : १०,३३२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uruli Kanchan Crime : आरपीआयची महिला नेता असल्याची धमकी देऊन २ गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

Maoist Encounter : एक कोटींपेक्षा अधिकचा इनाम असलेला माओवादी लीडर गणेश उईकेसह सहा जण चकमकीत ठार!

Virar Municipal Election : बहुजन विकास आघाडीतून सत्तेसाठी आलेल्याना तिकीट देऊ नका; भाजपाच्या जेष्ठ नेत्यांचा नेतृत्वाला इशारा

Latest Marathi News Live Update : हिंदूंच्या घरांवर हल्ला करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना बांगलादेश पोलिसांनी बक्षीस जाहीर केले

MPSC Exam Update: MPSC कडून उत्तरपत्रिकेची नवी रचना जाहीर; जाणून घ्या काय बदलले आहे

SCROLL FOR NEXT