Education sarathi state govt Chhatrapati Shahu Maharaj National Research Scholarship to students from Maratha community sakal
पुणे

SARTHI Scholarship : मराठा संशोधकांसाठी शासनाचा हात आखडता; सारथीद्वारे फक्त ५० विद्यार्थ्यांना मिळणार अधिछात्रवृत्ती; ८०० ने कपात

राज्यात कोटींच्या संख्येने असलेल्या मराठा समाजावर ही अन्यायकारक बाब असल्याचे उमेदवारांचे म्हणणे

सम्राट कदम

पुणे : मराठा समाजातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन ठरलेल्या छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी राज्य सरकारने हात आखडता घेतला आहे. जून २०२३ मध्ये पार पडलेल्या एका मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत अधिछात्रवृत्ती धारकांची संख्या फक्त ५० पर्यंत मर्यादित करण्यात आली असून, मागील वर्षी हीच संख्या ८५१ येवढी होती.

राज्यात कोटींच्या संख्येने असलेल्या मराठा समाजावर ही अन्यायकारक बाब असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) वतीने मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य केले जाते.

दरवर्षी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत असून, संशोधक विद्यार्थ्यांसाठीची या अधिछात्रवृत्तीचा शेकडो विद्यार्थ्याना फायदा होत आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सारथीने राज्यभरातून ८५१ विद्यार्थ्यांना संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी पात्र ठरविले होते.

मात्र यंदा फक्त ५० उमेदवारांपुरतीच ही शिष्यवृत्ती योजना मर्यादित ठेवल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. स्टुडंट हेल्पींग हॅंडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर म्हणतात, ‘‘अधिछात्रवृत्ती मध्ये समान निमावयली, विद्यावेतन देण्यात यावी.

सारथीचा लाभार्थी ही मराठा समाजातील पहिल्या पिढीचे पदवीधर आहे. आता कुठे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात ते आले आहेत.अशावेळी त्यांच्या संख्येवर मर्यादा घालणे योग्य नाही.’’ या संदर्भात सारथीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

संशोधन अधिछात्रवृत्तीचे महत्त्व

- विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रेरणा मिळते

- दीर्घकाळ संशोधनाच्या कालावधीत आर्थिकदृष्ट्या आधार मिळतो

- गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना याचा थेट फायदा होतो

- अप्रत्यक्षपणे संशोधनातील मराठा विद्यार्थ्यांचा टक्का वाढतो

उमेदवार म्हणतात...

- लोकसंख्येच्या तुलनेत शिष्यवृत्तीच्या जागा असाव्यात

- फक्त ५० विद्यार्थ्यांची निवड अन्यायकारक

- आर्थिक स्थैर्य असेल तरच विद्यार्थ्यांचा संशोधनाकडे कल वाढेल

- पीएच.डी. च्या नोदणीपासून मिळायला हवी अधिछात्रवृत्ती

संशोधनासाठी हात आखडता

संशोधक विद्यार्थ्यांच्या हिताकडे राज्य शासन नेहमीच दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विद्यार्थी करतात. वेगवेगळ्या महामंडळांच्या माध्यमातून संशोधन शिष्यवृत्ती मिळत होती. तर आता शासनानेच आता त्याला संख्येची मर्यादा घातली आहे. सारथी बरोबरच अनेक संस्थांच्या संशोधन अधिछात्रवृत्तीला मर्यादा घालण्यात आल्या आहेत. संस्थेप्रमाणे अधिछात्रवृत्ती धारकांची प्रस्तावित आकडेवारी..

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ः २००

- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) ः ५०

- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) ः ५०

- आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (टीआरटीआय) ः १००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur politics : कारे दुरावा कारे अबोला! मंत्री आबिटकर-मुश्रीफ यांच्यातील नाराजी उघड, बँकेच्या अहवालात पालकमंत्र्यांचा फोटोच नाही

Rain-Maharashtra Latest live news update: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

Stock Market Opening: सेन्सेक्स 27 अंकांच्या वाढीसह उघडला; बँकिंग शेअर्समध्ये विक्री, कोणते शेअर्स वाढले?

Dhanashree Verama: युझवेंद्र चहलच्या 'Sugar Daddy' टी शर्टवर धनश्रीची जोरदार टीका; म्हणाली, मी कोर्टात रडले आणि तो...

Pune Rain Alert : पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT