पुणे

शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव आवश्यक ः अरविंद पारगावकर

CD

PNE26W44149
अहिल्यानगर ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात मराठा चेंबर्स ॲण्ड कॉमर्सच्या अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष अरविंद पारगावकर यांचा सत्कार करताना सहायक कुलसचिव डॉ. शिवप्रसाद घालमे. समवेत मान्यवर.
-----------------
शिक्षणाबरोबरच सामाजिक
जाणीव आवश्यक ः पारगावकर
अहिल्यानगर, ता. २३ ः भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश आहे. महासत्ता होण्यासाठी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान व चांगले चारित्र्य यांचा विकास होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मराठा चेंबर्स ॲण्ड कॉमर्सच्या अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष अरविंद पारगावकर यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात आयोजित कार्यक्रम प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सहायक कुलसचिव डॉ.शिवप्रसाद घालमे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संदीप पालवे, अधिसभेचे सदस्य अमोल घोलप आदी उपस्थित होते.
पारगावकर यांनी अहिल्यानगर उपकेंद्राच्या सक्षमीकरणासाठी सीएसआर फंडामधून विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे प्रगत संगणक देण्याचे आश्वासन दिले. डॉ. घालमे यांनी आजपर्यंतचा उपकेंद्र अहिल्यानगरचा प्रवास विषद केला. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेंद्र विखे - पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सुरू झालेल्या बीएस्सी डाटा सायन्स अभ्यासक्रम सुरू झाला. त्यांनी जिल्हा नियोजन समितीकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने विद्यार्थ्यांना प्रवासासाठी इलेक्ट्रिक स्कूल बस मान्य झाल्याचे सांगितले. प्रा. संदीप पालवे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. बी. के. थोरवे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUC Fee Hike: वाहनचालकांना मोठा झटका! महाराष्ट्रात PUC तपासणीचे दर वाढले, आता किती पैसे मोजावे लागणार?

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव येणाऱ्या स्कॉर्पिओचा टायर अचानक फुटला

12व्या वर्षीच दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या सायरा बानो, 22 वर्षांचं अंतर असूनही केलं लग्न, 55 वर्षं जपलं नातं

Marathi News Live Updates : विडी उद्योजकांकडून महाराष्ट्र सोडूण्याचा इशारा, कारण काय?

Paithan Bus Accident: पैठणमध्ये भरधाव ट्रॅव्हल बसची ट्रकला जोरदार धडक; आठ प्रवासी जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT