Online Discussion
Online Discussion Sakal
पुणे

वस्त्यांमधील मुलांसाठी ‘शिक्षणगंगा’ सुरू

जितेंद्र मैड

कोथरुड - शिक्षणाची (Education) आवड आहे; पण शाळेची फी (School Fee) परवडणारी नाही, शिक्षणासाठी साधने नाहीत, महापालिकेच्या शाळा (Municipal School) आहेत; पण भाषा वेगळी आहे, अल्पवयात होणारे लग्न, रोजची भांडणे आणि व्यसने इत्यादी अडचणींमुळे विविध वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये (Children) शिक्षणाची गोडी टिकवणे एक मोठे आव्हान आहे. समाजाची ही गरज लक्षात घेऊन एकत्र आलेल्या युवकांनी ‘शिक्षणगंगा’ हा प्रकल्प (Shikshanganga Project) सुरु केला आहे. (Education Started for Children in the Slums)

‘टीच फॉर इंडिया’ या संस्थेकडून पूर्ण वेळ शिक्षक फेलोशिप मिळाल्यानंतर आलेल्या अनुभवाच्या बळावर सम्राट पवार या युवकाने ‘फर्ग्युसन कॉलेज’च्या काही मित्रांसोबत ऑनलाइन अभ्यासवर्ग सुरू केला. त्यानंतर वेदांत होनराव, सुयश जाधव, प्रीती जोशी, रोहन पवार, निशिगंधा देशमुख, सलोनी हारकळ, दीपक आडगावकर, यश नरसुडे, तनया गावडे या उपक्रमात जोडले गेले.

कोरोनाचे संकट लक्षात घेऊन या गटाने ‘स्वामी विवेकानंद सेंट्रल डिजिटल स्कूल’ या नावाने ‘व्हर्च्युअल’ शाळा सुरू केली. या शाळेच्या माध्यमातून, शहरी आणि ग्रामीण भागातून दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थी जोडले गेले. शिवाय त्यांना शिकवण्यासाठी ८० अधीमित्र जोडले गेले. प्रत्येक अधिमित्रला शालेय अभ्यासक्रम, नेतृत्व विकसन, तंत्रज्ञान वापर, कलेचा वापर, प्रयोगत्मक विज्ञान वापर, ताणतणाव व्यवस्थापन, लिंग समभाव प्रशिक्षण, बाल मानसशास्त्र या विषयासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.

संस्थेच्या माध्यमातून युवांना शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले. कोणताही मोबदला न घेता शिक्षणाचे हे काम सुरु आहे. स्वखर्चाने या युवकांनी www.shikshanganga.com हे संकेतस्थळ सुरु केले आहे. त्यांनी स्वतः अभ्यास करुन हे संकेतस्थळ तयार केले आहे.

परिवर्तनाची भाषा अनेकजण बोलतात; पण प्रत्यक्ष कृती करुन काही वेगळे घडवण्याचा प्रयत्न करणारे थोडे असतात. युवकांचा एक गट ‘शिक्षणगंगा’ सारखा प्रकल्प सुरु करतो आणि अनेकांना त्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करतो, हे समाजाच्या विकासासाठी गरजेचे आहे.

काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि मानसिक जडणघडणीवर शिक्षणाबरोबरच समांतर काम करण्यावर ‘शिक्षणगंगा’ चळवळ भर देत आहे. गुणवत्ता आधारित शिक्षण, अनुभव, कला आणि प्रयोगाधारित शिक्षण या गोष्टीवर आमचे संशोधन सुरू आहे.

- सम्राट पवार, शिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SCROLL FOR NEXT