education Vocational training for minority students in Aundh Iti sakal
पुणे

Pune News : औंध आयटीआयमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण

सुरुवातीला अल्पसंख्याक समाजातील युवकांसाठी एकूण सहा अभ्यासक्रम सुरू

सकाळ वृत्तसेवा

औंध : कौशल्य विकास,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत औंध येथील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १३ मार्चपासून अल्पसंख्यांक युवक-युवतींसाठी अल्पमुदतीच्या रोजगारक्षम विनाशुल्क व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम,शिख, जैन,पारसी,ख्रिश्चन तसेच बौद्ध,नवबौद्ध,हिंदू-महार या घटकातील काही कारणास्तव पूर्णवेळ किंवा दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण पूर्ण करू शकत नाहीत अशा बेरोजगार युवक,युवती किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना अधिकचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी या अल्पमुदतीच्या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

सुरुवातीला अल्पसंख्याक समाजातील युवकांसाठी एकूण सहा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून त्यामध्ये फील्ड टेक्निशियन-एसी,सीएनसी सेटर कम ऑपरेटर टर्निंग, ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल,क्यूसी इन्स्पेक्टर लेव्हल ४,ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन लेव्हल ३,मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग/शील्डेड मेटल आर्क वेल्डिंग वेल्डर या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

यापैकी फील्ड टेक्निशियन-एसी हा अभ्यासक्रम १३ मार्च २०२३ पासून सुरु करण्यात येत आहे.या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी १८ ते ४० वर्षे वयोमर्यादा असून किमान इयत्ता आठवी ते दहावी उत्तीर्ण शिक्षण असावे.या अभ्यासक्रमांना प्रवेश देताना युवतींना प्राधान्य देण्यात येणार असून प्रत्येक व्यवसायातील प्रवेश क्षमता ३० आहे.

अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्याचा असून प्रवेश घेण्यासाठी गुणपत्रिका,शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट,आधार कार्डची छायांकित प्रत, अल्पसंख्याक उमेदवारांसाठी अल्पसंख्याक असल्याचा पुरावा आदी कागदपत्रे तसेच दोन छायाचित्रे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी सुनिल तुपलोंढे (९८५०१५१८२५),जे.आय.गवंडी (८०८७१५०५०५) व सोहेल शेख (९६३७३९५८३३) यांच्याशी संपर्क साधावा.या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे उपसंचालक रमाकांत भावसार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT