पुणे

शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रभावीपणे पाठपुरावा करणार

CD

कोल्हापूर, ता. १२ : ‘शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी शासन दरबारी प्रभावीपणे पाठपुरावा करणार असल्याची,’ ग्वाही भाजप व महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी आज येथे दिली. त्यांनी कोल्हापुरातील शिक्षक, प्राचार्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला.
येथील महावीर महाविद्यालय, नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज आणि श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाला गावडे यांनी भेट दिली. त्यांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील सद्यस्थिती, शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक उपाययोजना आणि भविष्यातील आव्हाने यावर चर्चा केली.
शिक्षकांचा सन्मान, त्यांच्या प्रश्नांची जाण आणि शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी संवाद व समन्वय, या मुद्द्यांवर केंद्रित असलेल्या या भेटींमधून शैक्षणिक क्षेत्रातील विविध घटकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. शिक्षकांच्या अपेक्षा जाणून घेत त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार गावडे यांनी व्यक्त केला.
महावीर महाविद्यालयात प्राचार्य डॉ. ए. डी. जोशी, दादासाहेब मगदूम हायस्कूलचे मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद, कला शाखेचे अधिष्ठाता डॉ. गोमटेश पाटील उपस्थित होते. नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे दि मोहमेडन एज्युकेशन सोसायटीचे मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर, स्कूल कमिटीचे अध्यक्ष रफीक शेख, मुख्याध्यापक काजे यांच्याशी शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा झाली. गोखले कॉलेज येथे अध्यक्ष डॉ. मंजिरी मोरे-देसाई, पेट्रन कौन्सिलचे दौलत देसाई, सचिव प्रा. जयकुमार देसाई, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, उपप्राचार्य वाय. डी. पाटील यांच्या संवाद साधण्यात आला. शहाजी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, डॉ. अनिल मालगुडे, के. एन. दसाई, नॅक समन्वयक राहुल मांडणीकर उपस्थित होते.

फोटो ः 69614

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा..

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT