पुणे

पुणे : 'बाटू'चे शैक्षणिक कामकाज मेपासून सुरू

सकाळवृत्तसेवा

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाने १५ मार्च ते ३० एप्रिल हा कालावधी अंतरिम सुटी म्हणून जाहीर केली आहे.१ मेपासून वर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

'कोरोना'च्या संसर्गामुळे देशातील स्थिती संवेदनशील आहे. सर्वच विद्यापीठांनी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तर आगामी वर्षाच्या वैद्यकीय, अभियांत्रिकीसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे, स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. नेमक्या परीक्षा कधी होतील याबाबत काहीच स्पष्टता नाही. असे असताना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ब्रिजेश अय्यर यांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठीचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.  विद्यापीठाचे शैक्षणिक कामकाज १ मेपासून सुरू केले जाणार आहे, तर १६ जूनपासून परीक्षा घेतल्या जातील.

१ ते १४ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांचा कार्यानुभव (इंटर्नशीप) असेल. तर नवे शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जुलैपासून केली जाणार असल्याचे असे वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, आवश्यकता भासल्यास प्राध्यापकांना बोलवण्यात येईल असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Hallucination: धक्कादायक! सरकारी आदेशातच चक्क सुप्रीम कोर्टाचे बनावट निकाल? मुंबई उच्च न्यायालयाने काय केले पाहा...

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

Diwali Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांची मेजवानी! महाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांत राहणार बंद; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Rocket Firecrackers Ban: दिवाळीच्या उत्साहावर नियमांचं बंधन! मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी; महापालिकेचा मोठा निर्णय

Maharashtra Live News: अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये फटाक्यांच्या पैशांवरून झालेल्या वादातून रक्तरंजित हल्ला; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT