पुणे

उज्ज्वल भवितव्यासाठी इतिहास आणि पुरातत्त्वाच्या अध्ययनाची गरज : डॉ. विनय सहस्त्रबुध्दे

दिलीप कु-हाडे

येरवडा : तंत्रज्ञान जगायचे कसे हे शिकविते. साहित्य का जगायचे हे सांगते. मात्र उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी इतिहास आणि पुरातत्त्व यांचे अध्ययन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यसभा सदस्य आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी केले. 

डेक्कन कॉलेजच्या अकराव्या दीक्षांत समारंभप्रसंगी डॉ. सहस्त्रबुध्दे बोलत होते. यावेळी कुलपती डॉ. अरविंद जामखेडकर, कुलगुरू डॉ. वसंत शिंदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. विजय भटकर उपस्थित होते. 

डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले, ‘‘ पुरातत्त्वशास्त्र आणि इतिहास ह्या भूतकाळ आणि भविष्यकाळाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या कड्या आहेत.पुरातत्त्वशास्त्र, इतिहास आणि वस्तुसंग्रहालयेशास्त्र व्यक्तीच्या अस्मितेसाठी अत्यावश्यक आहेत.’’
प्रास्ताविक भाषणात डॉ. शिंदे यांनी पुरातत्त्वशास्त्र, भाषाशास्त्र आणि
संस्कृत व कोशशास्त्र या विषयातील विद्यापीठाच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचा आढावा घेऊन डेक्कन कॉलेजने केलेल्या राखीगढी उत्खननाच्या संदर्भात पुरातत्त्व क्षेत्रात विशेष योगदानाचा प्रामुख्याने उल्लेख केला. डॉ. अरविंद जामखेडकर यांनी सांस्कृतिक वारश्यांचे जतन करतांना प्राचीन ज्ञानशाखांची मदत घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

पुरातत्त्वशास्त्रातील उल्लेखनीय योगदानासाठी के. एन. दीक्षित आणि डॉ. कल्याणरमण, भाषाशास्त्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रा.हान्स हॉक आणि संस्कृत व कोशशास्त्रातील उल्लेखनीय योगदानासाठी डॉ.व्ही. एन. झा यांना मानद डी. लिट.पदवीने सन्मानित करण्यात आले.

या दीक्षांत समारंभप्रसंगी एकूण १२१ विद्यार्थ्यांना प्राचिन भाषा इतिहास संशोधन व पुरातत्त्वशास्त्र, भाषाशास्त्र आणि संस्कृत व कोशशास्त्र या विषयातील एमए, एम.फिल. आणि पीएचडी प्रदान करण्यात आल्या. कार्यकमाचे सूत्रसंचालन प्रा.सोनल कुलकर्णी-जोशी यांनी केले. प्रकुलगुरू प्रा. प्रसाद जोशी यांनी आभार मानले. 

पुण्यात पानशेत धरण फुटल्यानंतर पुणेकरांना पिण्याच्या पाण्याची अडचण उद्भवली नाही. कारण पेशवेकालीन पाण्याची जुनी वितरण व्यवस्था चांगल्या स्थितीत होती. भूमिगत असलेल्या वाहिन्यांमधून कात्रज तलावातून पाणी पुण्यातील पेठांमधील विहिरींमध्ये पाणी येत होते, असे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT