Dr. Pratik Kad and Kung Ja Ha Sakal
पुणे

Pune News : हिमनद्यांवर मॉन्सून परिवर्तनशीलतेचा परिणाम; चाकणच्या शास्त्रज्ञाचे संशोधन

हिमनद्यांच्या महापुरासाठी जागतिक तापमानवाढ नव्हे, तर मॉन्सूनची नैसर्गिक परिवर्तनशीलता (व्हेरिॲबिलिटी) कारणीभूत असल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष एका मराठमोळ्या शास्त्रज्ञाच्या संशोधनातून पुढे आला आहे.

सम्राट कदम

पुणे - हिमनद्यांच्या महापुरासाठी जागतिक तापमानवाढ नव्हे, तर मॉन्सूनची नैसर्गिक परिवर्तनशीलता (व्हेरिॲबिलिटी) कारणीभूत असल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष एका मराठमोळ्या शास्त्रज्ञाच्या संशोधनातून पुढे आला आहे. पूर्व हिमालयातील हिमनद्यांतील पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळित होत असून, जैवविविधतेवरही दूरगामी परिणाम होत आहे. त्यामुळे मराठी शास्त्रज्ञाचे हे संशोधन निश्चितच धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मूळचे चाकण (जि. पुणे) येथील रहिवासी आणि दक्षिण कोरियातील पुसान नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये पीएच.डी. पूर्ण करणारे डॉ. प्रतीक कड यांचे संशोधन आता चर्चेचा विषय झाला आहे. पुसान विद्यापीठाच्या प्रा. क्युंग-जा हा यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. संशोधनाच्या व्याप्तीबद्दल कड म्हणाले, ‘‘एका बाजूला जागतिक तापमानवाढीमुळे हिमालयातील हिमनग वितळत आहेत.

त्यामुळे आलेल्या पुराचा फटका काझीरंगा किंवा पूर्वांचलातील जीवसृष्टीला बसत आहे, असा एक समज होता. मागील काही वर्षांत हिमालयाच्या पूर्वेकडील व ईशान्य भारतात मॉन्सूनचा कल कमी झाला आहे. मात्र, आम्ही केलेल्या संशोधनात हवामान बदलापेक्षा मॉन्सूनमधील परिवर्तनशीलता सर्वाधिक कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. हिमालयात एक प्रकारचे नैसर्गिक चक्र असून, मॉन्सूनची कोरडी आणि ओली वर्षे तेथे पाहायला मिळतात.’

हिमनद्यांमधील पुरासाठी जागतिक तापमानवाढ फार प्रमाणात जबाबदार नसल्याचे या संशोधनातून पुढे आले आहे. अधिकच्या अभ्यासानंतर धोरणात्मक नियोजन करता येईल. ‘जर्नल ऑफ जिओफिजिकल रिसर्च : ॲटमॉस्फियर’ या शोधपत्रिकेत संशोधन प्रकाशित झाले आहे.

...असे झाले संशोधन

  • १९७९ ते २०२१ या ४३ वर्षांच्या हिमालयातील हवामानाचा अभ्यास

  • एकापेक्षा अधिक डेटासेटचा वापर विस्तृत विश्‍लेषणासाठी केला

  • पर्जन्यमान आणि नदीतील पाण्याचे विसर्जन यांच्यातील सहसंबंधाचे विश्लेषण केले

  • अधिक पर्जन्यमान आणि कमी पर्जन्यमान यांचा तुलनात्मक अभ्यास

निष्कर्ष :

  • हिमालयातील नदीच्या विसर्जनात पर्जन्यमानाचा मोठा वाटा आहे. मात्र, हिम वितळण्यामुळे होणारे परिणाम काहीअंशी नाकारता येत नाही.

  • उष्णता व आर्द्रतेपेक्षा (थर्मोडायनामिक्स) वायुमंडलीय गतिशीलतेचा हिमालयीन नद्यांच्या विसर्जनावर सर्वाधिक परिणाम

  • नैसर्गिक परिवर्तनशीलता समजून घेतल्यास हिमालयातील पुराचा अंदाज सुधारू शकतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI-Jio safety alert system: ‘हायवे’वरील धोक्यांचा इशारा आता मोबाइलवर आधीच कळणार ; 'NHAI-Jio' मध्ये करार!

मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून! पोलिस भरतीत एका पदासाठी ८३ उमेदवार; इच्छुकांना रविवारपर्यंत करता येईल अर्ज; १५,६३१ पदांची भरती

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांची 'ही' मागणी फेटाळून लावली

Pune Voter List : मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी आज शेवटचा दिवस; हरकतींची संख्या १२ हजाराच्या वर!

Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या अचानक हल्ल्याने भागूबाई खोडदे यांचा बळी; पारनेर तालुक्यात भीतीचं वातावरण!

SCROLL FOR NEXT