Dilip Walse Patil sakal
पुणे

Dilip Walse Patil : शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत

'भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. राज्यघटनेने समाजातील सर्व नागरिकांना समान हक्क प्रदान केले आहेत.

डी. के. वळसे पाटील

मंचर - 'भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. राज्यघटनेने समाजातील सर्व नागरिकांना समान हक्क प्रदान केले आहेत. आदिवासी नागरिकांचे हक्क अबाधित आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. आदिवासी समाजाच्या प्रगतीकरीता शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. असे राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

कोटमदरा- घोडेगाव (ता.आंबेगाव) येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुक्रवारी (ता. ९) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव कार्यालयाच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात वळसे पाटील बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, सहायक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी संदीप पाटील, विजया पंढुरे, बाळासाहेब बेंडे, पूर्वा वळसे पाटील, प्रकाश घोलप,संदीप चपटे, संजय गवारी आदी उपस्थित होते.

आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळेतील गुणवंत विद्यार्थी, शासकीय वसतिगृह व आश्रमशाळेतील स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी आदिवासी बचत गटाच्यावतीने मांडण्यात आलेल्या स्टॉलला भेट देऊन उत्पादनाची माहिती घेतली.

वळसे पाटील म्हणाले, 'पुणे येथे सात हजार विद्यार्थी क्षमतेचे आदिवासी वसतिगृह उभारण्याबाबत राज्याच्या आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. आदिवासी समाजातील मुलांनी उच्च शिक्षणाकडे अधिक लक्ष केंद्रित करावे. शिक्षणाच्या माध्यमातून आयुष्यात परिवर्तन होते. मोफत शिक्षण, निवास, भोजन, शिष्यवृत्ती, प्रशस्त इमारतींसह आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सुविधेचा शिक्षणाकरीता उपयोग केला पाहिजे.'

संदीप पाटील म्हणाले, 'एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. रस्ते, वीज, पाणी, विद्युत योजना अशा पायाभूत सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आहे.'

'आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी यापुढे पारंपारिक पिके घेण्याऐवजी स्ट्रोबेरी पिक घ्यावे. त्यासाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य व बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी विविध लोककल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही.'

- दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

Xiaomi 18 Pro Series होणार लाँच! 8500mAh बॅटरी, ड्युअल 200MP Leica कॅमेरा; पाहा नव्या फ्लॅगशिपचे भन्नाट फीचर्स!

Mumbai Water Metro: मुंबई वॉटर मेट्रोसाठी समुद्रतळाचा मोठा अडथळा; खडकाळ भागात ‘रॉक ड्रेजिंग’, २५० किमी जलमार्गांचा विकास

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT