Egypt-Onion
Egypt-Onion 
पुणे

तुर्कस्ताननंतर इजिप्तचा कांदा पिंपरीत दाखल

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - देशी कांद्याच्या भावाने उच्चांक गाठल्याने पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत इजिप्तचा लाल कांदा दाखल झाला आहे. यापूर्वी तुर्कस्तानचा कांदा भाजी मंडईत आला होता. मात्र, सध्या तुर्कस्तानचा कांदा मंडईत कमी प्रमाणात शिल्लक राहिला आहे, त्यामुळे इजिप्तच्या कांद्याला मागणी वाढेल, अशी अपेक्षा कांदा विक्रेत्यांनी व्यक्त केली.

इजिप्तचा कांदा पुण्यातील गुलटेकडी मार्केट येथून गुरुवारी (ता. ५) पिंपरीत दाखल झाला. सध्या किरकोळ विक्रेत्यांनी एक टनापर्यंत कांदा मागविला आहे. त्याची विक्री सध्या १२० रुपये प्रतिकिलोप्रमाणे होत असून, हा कांदा थंड व लाल रंगाचा आहे. कांदा सडू नये, यासाठी एसी गाडीमधून त्याची आयात करण्यात आली आहे. यासाठी ८ टक्के अडत घेतली जात आहे. 

देशी कांद्याचे भाव दीडशे रुपयांच्यावर गेले आहेत, त्यामुळे गृहिणींनीही जेवणातून कांदा कमी केला आहे, तर खाणावळीतूनही कांदा गायब झाला आहे. देशी कांद्यापेक्षा इजिप्तचा कांदा तीस ते चाळीस रुपयांनी स्वस्त असल्याने महिला खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : खलील अहमदने दिला मुंबईला पहिला झटका; सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात बाद

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Lok Sabha Election 2024 : भिवंडीत ‘तुतारी’ला सूर गवसेना; मित्रपक्षाच्या ‘हाता’ने वाढवली डोकेदुखी

T20 WC 24 India Squad : अजित आगरकर पोहचला दिल्लीत; लवकरच निश्चित होणार भारताचा वर्ल्डकप संघ?

SCROLL FOR NEXT