जुन्नर sakal
पुणे

Eid Mubarak : जुन्नरला ईदगाह मैदानावर ईदची सामूहिक नमाज

आमदार अतुल बेनके यांच्या आमदार निधीतून ईदगाह मैदानापर्यंत जाण्यासाठी रस्ता करण्यात आला असून नमाज पठण करण्यासाठी शेडची उभारणी करण्यात आली आहे

दत्ता म्हसकर ः सकाळ वृत्तसेवा

जुन्नर- दत्ता म्हसकर सुमारे चारशे वर्षांच्या परंपरेनुसार जुन्नर-नारायणगाव रस्त्यावरील उंच टेकडीवर असलेल्या ईदगाह येथे मुस्लिम बांधवांनी आज शनिवार ता.२३ रोजी सकाळी रमजान ईद निमित्त सामूहिक नमाज पठण केले व एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

एक महिन्याचे उपवास पूर्ण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी मौलाना इम्रान बेग यांच्या उपस्थितीत ईदगाह येथे प्रार्थना व नमाज पठण केले. यावेळी युवा नेते अमित बेनके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मित्तल, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, पोलीस निरीक्षक नारायण पवार तसेच ईदगाह कमिटीचे सदस्य व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार अतुल बेनके यांच्या आमदार निधीतून ईदगाह मैदानापर्यंत जाण्यासाठी रस्ता करण्यात आला असून नमाज पठण करण्यासाठी शेडची उभारणी करण्यात आली आहे या शेडमध्ये प्रथमच ईदEची नमाज झाली. रस्ता व शेड यामुळे मुस्लिम बांधवांची ऊन पावसात होणारी गैरसोय दूर झाली आहे.

माजी उपनगराध्यक्ष फिरोज पठाण यांनी प्रास्तविक केले. अमित बेनके व मित्तल यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदगाह कमिटीचे अध्यक्ष हाजी कूददूस बेग यांनी स्वागत केले. माजी नगरसेवक जमीर कागदी यांनी आभार मानले.

जुन्नर शहरातील मुस्लिम बांधवांनी आपल्या परिसरातील मास्जिद मध्ये नमाज पठण करून ईदचा सण उत्साहात साजरा केला. जुन्नर शहरातील पिरजादे वाडा, खलीलपूर,माई मोहल्ला तसेच जामा,कादरी,मणियार, संगतराश,रोशन,दिवाने ए अहेमद आदी मशिदीत मौलानांच्या उपस्थितीत नमाज पठाण करण्यात आले तसेच सामाजिक शांतता व सलोख्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Government Scheme: मोफत लाभ घ्या सरकारकडून! या 7 सरकारी योजनांचा फायदा तुम्ही घेताय का? अनेकांना तर याची माहितीच नाही...

Nashik Bike Theft : नाशिकमध्ये दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच वेळी सहा वाहने लंपास, वाहनधारकांमध्ये संतापाची लाट

Nashik Industrial Fire : सातपूर हादरले! वासाळीत दोन प्लॅस्टिक गुदामांना भीषण आग; एक कोटींचे साहित्य खाक

Latest Marathi News Live Update : लातूराच्या रेणापूर, अहमदपूर भागात अवकाळी पाऊस, रब्बी पिकांना फटका

Solapur News: माळशिरसच्या तलाव, बंधाऱ्यांत ४० टक्के पाणीसाठा; गतवर्षी चार गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा, संभाव्य टंचाई आराखडा तयार!

SCROLL FOR NEXT