Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation sakal
पुणे

पुणे महापालिकेसाठी सव्वा आठ लाख मतदार वाढले

ब्रिजमोहन पाटील

निवडणूक आयोगाकडून ३१ मे २०२२ रोजी विधानसभेसाठी अंतिम मतदार यादी जाहीर केली.

पुणे - पुणे महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीतून २०१७ च्या तुलनेत २०२२ च्या निवडणूकीसाठी तब्बल ८ लाख २३ हजार ९१६ मतदार वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये धक्कादायक म्हणजे सर्वात जास्त मतदार प्रभाग क्रमांक ५४ यामध्ये १ लाख ३ हजार ९५९ मतदार आहेत, हा एक लाखापेक्षा जास्त मतदार असलेला एकमेव प्रभाग झाला आहे. त्यामुळे एकाच प्रभागात एवढे मतदार कसे वाढले याची उत्सुकता लागली आहे. तर प्रभाग क्रमांक २४ या मगरपट्टा- साधन विद्यालय या प्रभागात सर्वात कमी ३४ हजार ८० मतदार आहेत. ही मतदार संख्या प्रारूप यादीतील आहे, नागरिक, राजकीय पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यात बदल होणार असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रारूप मतदार यादीबाबत अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. निवडणूक शाखेचे उपायुक्त यशवंत माने, संदीप कदम यावेळी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाकडून ३१ मे २०२२ रोजी विधानसभेसाठी अंतिम मतदार यादी जाहीर केली. ही यादी महापालिका निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे. ३४ लाख ५७ हजार ७१४ मतदारांसाठी सुमारे २९०० मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रभागाच्या हद्दीनुसार त्यांची विभागणी करण्यात आलेली आहे. या प्रारूप रचनेवर आक्षेप व सूचना करण्यासाठी १ जुलै पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नागरिकांनी महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयासह सावरकर भवन येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयातही लेखी तक्रार नोंदवू शकतात. या तक्रारींचा अभ्यास करून आवश्यक तेथे बदल केले जातील, असे बिनवडे यांनी सांगितले.

हरकतींच्या पडताळणीसाठी पथक

प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतींची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय १० जणांचे पथक तयार केले आहे. हरकतींची पडताळणी करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली जाईल. त्यात तथ्य असेल तर बदल केला जाईल, हे सर्व बदल ८ जुलै पर्यंत करून ९ जुलैला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे, असे उपायुक्त यशवंत माने यांनी सांगितले.

  • अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध - १३ मे २०२२

  • विधानसभा मतदारसंघ निहाय अंतिम नोंदणी - ३१ मे २०२२

  • महापालिकेसाठी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध - २३ जून २०२२

  • हरकती व सूचना करण्यासाठी मुदत - २३ जून २०२२ ते १ जुलै २०२२

  • अंतिम मतदार यादी प्रसिद्ध - ९ जुलै २०२२

याठिकाणी द्या हरकती व सूचना

लेखी स्वरूपात तक्रारी करण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बालगंधर्व रंगमंदिर शेजारील सावरकर भवन येथील निवडणूक कार्यालयाच्या कार्यालयात हरकत नोंदविता येईल. आॅनलाइन हरकतीसाठी election@punecorporation.org यावर इमेल करता येईल.

२०१७ आणि २०२२ ची मतदारांची तुलना

तपशील २०१७ २०२२

पुण्याची लोकसंख्या ३१,३२,१४३ ३५,५६,८२४

निवडून द्यायचे सदस्य १६२ १७३

महिला सदस्य ८१ ८७

एकूण मतदार (प्रारूप यादी) २६,३४, ७९८ ३४,५८,७१४

एकूण पुरुष मतदार १३,५७,९६६ १८,०७,६६३

एकूण महिला मतदार १२, ७६,७६५ १६,५०,८०७

एकूण इतर मतदार ६७ २४४

मतदान केंद्र ३४३१ ४३२४ (अंदाजे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT