Indian Students Sakal
पुणे

पुण्यातील आणखी आठ विद्यार्थी गेल्या दोन दिवसात युक्रेनमधून पुण्यात परतले

गेल्या रविवारी म्हणजेच २७ फेब्रुवारीला पुण्यातील चार विद्यार्थी युक्रेनवरून परत आले होते.

सकाळ वृत्तसेवा

गेल्या रविवारी म्हणजेच २७ फेब्रुवारीला पुण्यातील चार विद्यार्थी युक्रेनवरून परत आले होते.

पुणे - पुण्यातील आणखी आठ विद्यार्थी (Students) गेल्या दोन दिवसात युक्रेनमधून (Ukraine) पुण्यात (Pune) परतले आहेत. हे विद्यार्थी बुधवारी व गुरुवारी परतले (Return) आहेत. याआधी चार विद्यार्थी परत आलेले असल्याने, आतापर्यंत परतलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या आता बारा झाली असल्याची माहिती गुरुवारी (ता.३) जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

गेल्या रविवारी म्हणजेच २७ फेब्रुवारीला पुण्यातील चार विद्यार्थी युक्रेनवरून परत आले होते. गेल्या दोन दिवसात परत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ऋतुजा शिर्के, मानसी करंजकर, पियुष थोरात, गायत्री फटांगरे, मयूर मंडले, विशाल मोरे, तोबीन कोशाय, जान्हवी सांडभोर या आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याआधी परतलेल्या चार विद्यार्थ्यांमध्ये निधी जगताप, सुश्मिता राठोड, श्रुती लोहोकरे आणि सिद्धी नाईक यांचा समावेश आहे.

पुणे शहर व जिल्ह्यातील सुमारे १०० विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेले असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे. यापैकी आतापर्यंत अवघे बारा विद्यार्थी परतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात व्यावसायिकाच्या दुकानातून दहा लाखांची रोकड लंपास; कामगाराविरुद्ध खडक पोलिसांत गुन्हा

Latest Marathi News Live Update : गोवंडीत उभ्या असलेल्या वाहनात सीएनजी स्फोट

Pune Crime: हडपसरमधील मगरपट्टा परिसरात घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू; चेअरमनसह पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा, नेमकं काय घडलं!

पुस्तकावरून वाद पेटला; शिंदे गटाच्या आमदाराचा संताप अनावर; प्रकाशकाला फोनवर अश्लील धमक्या, ऑडिओ व्हायरल

Free Education for Girls Maharashtra : मुलींना उच्चशिक्षण मोफत, पण विकास शुल्कचे बंधन; महाविद्यालय आकारतात 15 ते 25 हजार रुपये

SCROLL FOR NEXT