pimpri
pimpri 
पुणे

आठ पोलिस अधिकाऱ्यांची पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातून पुण्यात बदली

संदीप घिसे

पिंपरी (पुणे) - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या सात सहायक निरीक्षक आणि एका उपनिरीक्षकाची प्रशासकीय कारणास्तव पुणे पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली. १४ फेब्रुवारी रोजी याबाबतचे आदेश दिले. 

सहायक निरीक्षक नकुल सिध्दप्पा न्यामणे, अलका दामोदर सरग, गणेश जयसिंग धामणे, नीलेश दत्ता वाघमारे, जगन्नाथ महादेव बनसोडे, दिगंबर पांडुरंग सूर्यवंशी, राजू रामचंद्र ठुबल आणि उपनिरीक्षक नंदराज तुकाराम गभाले अशी बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाता काम करीत असलेल्या या आठ अधिकाऱ्यांची प्रशासकीय कारणास्तव पुणे पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली. पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी १४ फेब्रुवारी रोजी कार्यालयीन कामकाजानंतर या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याबाबतचे आदेश दिले.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील १५० पोलिस कर्मचारी पुणे आयुक्तालयात काम करण्यास इच्छुक आहेत. तर पुणे पोलिस आयुक्तालयातून २०० कर्मचारी पिंपरी चिंचवडमध्ये काम करण्यास इच्छुक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT