Crime esakal
पुणे

Pune Crime : बनावट शस्त्र परवान्यातून नोकरी मिळवणाऱ्या आठ सुरक्षारक्षकांना केली अटक

जम्मू काश्मीरमधून बनावट शस्त्र परवाना मिळवून त्याआधारे महाराष्ट्रात सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या आठ जणांना वानवडी पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जम्मू काश्मीरमधून बनावट शस्त्र परवाना मिळवून त्याआधारे महाराष्ट्रात सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या आठ जणांना वानवडी पोलिसांनी अटक केली. हे आरोपी मूळचे उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीरचे आहेत. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, १२ बोअरची बंदूक, ५६ काडतुसे, तीन बनावट शस्त्र परवाने असा सात लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संतोष जैनाथ शुक्ला (वय ५० रा. भागीरथीनगर, साडेसतरा नळी, हडपसर, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश), रामप्रसाद बुद्धा पासवान (वय ३५, रा. भिंगारवाडी, ता. पनवेल, जि. रायगड, मूळ रा. फत्तेपूर उत्तर प्रदेश), राजेश बबलू पासवान (वय ३५ रा. फत्तेपूर, अशोकनगर, उत्तर प्रदेश), दिनेश जगदीश पासवान (वय ५४ रा. गोपीपूर, उत्तर प्रदेश), इम्रान मोहमंद जिमी खान (वय ३०), मोहंमद बिलाल मोहंमद निसार (वय ३०), साहिलकुमार चमनलाल शर्मा (वय २५), गीतम देशराय शर्मा (वय २३, सर्व रा. राजौरी, जम्मू काश्मीर) अशी आरोपींची नावे आहेत.

हडपसर भागातील रामटेकडी परिसरात जुलै महिन्यात शुक्ला याला वानवडी पोलिसांच्या गस्त घालणाऱ्या पथकाने पकडले होते. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले होते. अधिक चौकशी केली असता साथीदारांकडे बंदूक आणि शस्त्र परवाना असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

त्यानंतर तळेगाव दाभाडे परिसरातील टोलनाक्यावर काम करत असणाऱ्या सुरक्षारक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील शस्त्र परवान्याबाबत चौकशी करण्यात आली. त्यावर तो बनावट असल्याचा अहवाल जम्मू काश्मीरमधील जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला. त्यानुसार कारवाई करण्यात आली.

वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT