death sakal
पुणे

Pune News : विहिरीत पडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

खेळताना तोल जाऊन विहिरीत पडून एका आठ वर्षीय मुलाचा शनिवारी (ता.१८) मृत्यू झाला. कोंढव्यातील भाग्योदय नगरमध्ये ही घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - खेळताना तोल जाऊन विहिरीत पडून एका आठ वर्षीय मुलाचा शनिवारी (ता.१८) मृत्यू झाला. कोंढव्यातील भाग्योदय नगरमध्ये ही घटना घडली.

मस्तान मुस्ताक शेख (वय ८, रा. भाग्योदय नगर, कोंढवा) असे विहिरीत पडून मृत्यू मुलाचे नाव आहे. याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संतोष सोनावणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्योदयमधील गल्ली क्रमांक २८ मध्ये मस्तान खेळत होता. खेळत असताना तोल गेल्याने ताे विहिरीत पडला. याबाबत तातडीने त्याच्या चुलत्याने तसेच आई-वडिलांनी अग्नीशमन दलाला कळविले.

तेव्हा अग्नीशमन दलाचे कर्मचारी व कोंढवा पोलिस चौकीच्या अधिकाऱ्यांनी मुलाला बाहेर काढले. त्यास ससून सर्वोपचार रूग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Returns : तब्बल 400 दिवसांनंतर 'माधुरी' परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत; उपस्थितांना आनंदाश्रू अनावर

Pimpri News : नोकरीपेक्षा आपला व्यवसायच बरा! दोन लाख ४९ हजार जण उद्योग-व्यवसायाकडे वळले

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT