rajesh-deshmukh
rajesh-deshmukh 
पुणे

वैद्यकीय उपचारासाठी उत्पादनाच्या 80 टक्के ऑक्‍सिजन उपलब्ध होणार - जिल्हाधिकारी

सकाळवृत्तसेवा

पुणे - सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ऑक्‍सिजन उत्पादकांनी एकूण उत्पादनाच्या 80 टक्के ऑक्‍सिजन वैद्यकीय उपचारासाठी आणि 20 टक्के ऑक्‍सिजन औद्योगिक उत्पादनासाठी उपलब्ध करुन द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात ऑक्‍सिजन उत्पादक, ऑक्‍सिजन सिलिंडर उत्पादक आणि पुरवठादारांसोबत बैठक घेण्यात आली. या वेळी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधितांना सूचना दिल्या. डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयांकडून ऑक्‍सिजनची मागणी वाढत आहे. गंभीर रुग्णांवर उपचार करताना ऑक्‍सिजनची कमतरता भासू नये, यासाठी उत्पादकांनी पुरेशा प्रमाणात व वेळेत ऑक्‍सिजनचा पुरवठा करावा. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रत्येकाचा जीव बहुमूल्य असून, प्रत्येक जीव वाचवणे महत्वाचे आहे. सध्या कोरोना परिस्थिती कठीण असली तरी ऑक्‍सिजन उत्पादक कंपन्या आणि सिलिंडर भरणाऱ्या व्यावसायकांनी लोकसेवेच्या भावनेतून जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. ऑक्‍सिजन सिलिंडर भरणाऱ्या उत्पादकांनी त्यांच्याकडील सिलिंडर केवळ वैद्यकीय उपचारासाठी वितरीत करावेत. रुग्णालय व ऑक्‍सिजन सिलिंडर भरणाऱ्या छोट्या उत्पादकांपर्यंत टॅंकर जलद गतीने पोचवण्यासाठी टॅंकरच्या वाहतूक वितरणादरम्यानच्या त्रुटी उत्पादकांनी दूर कराव्यात. 

या वेळी ऑक्‍सिजन उत्पादक कंपन्यांचे प्रमुख, ऑक्‍सिजन सिलिंडर भरणारे उत्पादक आणि पुरवठादारांनी जाणवणाऱ्या अडचणी मांडल्या. रुग्णालयांना पुरेसा ऑक्‍सिजन पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, अन्न, औषध, प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश पाटील, औषध निरीक्षक प्रमोद पाटील, सहायक आयुक्त शाम प्रतापराव, उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, जिल्हा उद्योग केंद्राचे सरव्यवस्थापक पी.डी. रेंदाळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर या वेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT