पुणे

एरंडगाव : नशामुक्त तरुणाई हाच सशक्त समाजाचा पाया : प्रीती दीदी

CD

EDG26A00004
एरंडगाव : एकनाथ माध्यमिक विद्यालयात नशामुक्ती अभियानात नशामुक्त जीवनशैलीची शपथ घेताना प्रीती दीदी, विद्यालयाचे मुख्याध्यापक माधवराव काटे, मान्यवर व विद्यार्थी.

नशामुक्त तरुणाई हाच सशक्त समाजाचा पाया

प्रीती दीदी ः एकनाथ विद्यालयात नशामुक्ती अभियान

एरंडगाव, ता. ६ ः राष्ट्राला सामर्थ्य देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केवळ तरुणच करू शकतात. मात्र, आजची तरुण पिढी विविध व्यसनांच्या विळख्यात अडकत असल्याने देशाचे भविष्य धोक्यात येत आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये नशामुक्तीचे संस्कार रुजविणे ही काळाची गरज आहे. नशामुक्त तरुणाई हाच सशक्त समाजाचा पाया आहे, असे प्रतिपादन शेवगाव येथील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या प्रीती दीदी यांनी केले.

एरंडगाव (ता. शेवगाव) येथील एकनाथ माध्यमिक विद्यालयात नशामुक्ती अभियान उत्साहात राबविण्यात आले. या अभियानात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रीती दीदी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक माधवराव काटे होते. याप्रसंगी डॉ. भरत गोरे, डॉ. सोनाजी लांडे, सोमनाथ लोखंडे आदी उपस्थित होते.

प्रीती दीदी म्हणाल्या, ‘‘देशातील दहा कोटी विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार घडविण्याचे काम शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून प्रभावीपणे होऊ शकते. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून आपल्या कुटुंबासह समाजालाही नशामुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मोबाईलच्या अतिवापरासह तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान आदी विविध व्यसनांपासून दूर राहावे.’’

यावेळी दिलीपकुमार रणसिंग, प्रकाश दहिफळे, कैलास नजन, अर्जुन घुगे, नवनाथ कदम, देवेंद्र बोडखे, विद्या भागवत उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन समद शेख, संजय मगर, धोंडीराम काळे आदींनी केले. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक माधवराव काटे यांनी केले, तर आभार मुकुंद आरे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT