eknath shinde bridge Chandni Chowk fall options are limited no discussion about inconvenience to citizens pune sakal
पुणे

चांदणी चौकातील पुलही पडणार, पर्यायही मर्यादीतच, नागरीकांच्या गैरसोईबाबत चर्चाच नाही

जुना पुल पाडल्यानंतर होणाऱ्या वाहतुक कोंडी, पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने वाहतुकीचे नियोजन करणार तरी कसे?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुरेशी पर्यायी व्यवस्था अजूनही तयार नसतानाही चांदणी चौकातील एनडीए-पाषाण रस्त्याला जोडणारा जुना पुल पाडल्यानंतर होणाऱ्या वाहतुक कोंडीचा नागरीकांनी आत्तापासूनच धसका घेतला आहे. वारजे, कोथरुडहून पाषाण, बावधनकडे जाणाऱ्या तसेच मुंबईहून आलेल्यांना बावधन पाषाणकडे जाताना प्रचंड गोंधळ उडणार आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने वाहतुकीचे नियोजन करणार तरी कसे ? असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरीकांसह पोलिसांनाही पडला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुचना दिल्यानंतर शनिवारी सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चांदणी चौक येथे भेट देऊन एनडीए-पाषाणला जोडणारा जुना पुल पाडून टाकण्याचे निश्‍चित केले. रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी परतीच्या प्रवासात चांदणी चौकामध्ये पाहणी केल्यानंतरही अधिकाऱ्यांनी मांडलेल्या सुचनांचा पुनरुच्चार केला. मात्र मुळशीकडून पाषाण, बावधन, कोथरुडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी अजूनही ठोस पर्यायी मार्ग ठरलेला नाही. पोलिसांकडून एनडीए चौक मार्गे कोथरुड अंडरपासची चाचपणी केली जात असली, तरीही त्यामुळे वाहतुक कोंडीमध्ये आणखीनच भर पडण्याची चिन्हे असल्याने पोलिसही त्याबाबत अधिक साशंक आहेत. तर पुल पाडल्यानंतर सर्वच रस्त्यांवर काही दिवस तरी होणाऱ्या प्रचंड वाहतुक कोंडीच्या शक्‍यतेबाबत मुख्यमंत्र्यांना कल्पना देण्याचे धाडस कोणी दाखवले नसल्याचीही सद्यस्थिती आहे.

मनुष्यबळ मिळेल, पण पायाभुत सुविधेचे काय ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 100 वॉर्डन देण्याची घोषणा केली आहे, पिंपरी चिंचवड पोलिसांनीही सुस-पाषाणसाठी स्वतंत्र वाहतुक विभागाची निर्मिती करुन त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळही देण्याचे निश्‍चित केले आहे. त्यामुळे चांदणी चौकामध्ये मनुष्यबळ उपलब्ध होईल, मात्र वारजेहून चांदणी चौकातुन पुढे जाण्यासाठी पर्यायी रस्ते मर्यादीत असल्याने आणि मुळशीकडून कोथरुड, साताऱ्याकडे जाण्यासाठीचा पुलही अद्याप पुर्ण नसल्याने पुन्हा वाहतुक कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

मुळशीकडून एनडीए चौक मार्गे कोथरुडकडे जाणाऱ्या वाहनचालकांचा उडणार गोंधळ मुळशी, एनडीए चौकमार्गे कोथरुडला जाण्यासाठीचा मार्ग सध्या बंद आहे. मात्र एनडीए-पाषाण जुना पुल पाडण्यापुर्वी मुळशीकडून कोथरुडला जाण्यासाठी एनडीए चौकातुन कोथरुड अंडरपास मार्गे वाहतुक सुरु करण्याचा वाहतुक शाखेचा प्रयत्न आहे. मात्र त्यामुळे कोथरुड अंडरपास येथे दोन्हीकडून येणारे रस्ते एकत्र मिळत असल्याने गोंधळात आणखीनच भर पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

पुल पाडल्यानंतर वाहतुक कोंडीचे काय ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील 15 दिवसांमधील वाहतुक नियोजन, मनुष्यबळ व पुल पाडण्याबाबतची माहिती दिली. मात्र 15 दिवसानंतर उद्‌भवणाऱ्या वाहतुक कोंडीबाबत कुठलेही भाष्य केले नाही. संबंधित वाहतुक कोंडीचा प्रश्‍न गंभीर होण्याची शक्‍यता असूनही मुख्यमंत्र्यांना त्याबाबत माहिती देण्याचे धाडस प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दाखविले नसल्याचीही सद्यस्थिती आहे.

""मुळशीकडून कोथरुडकडे जाण्यासाठी जुना पुल वापरता जातो, पण हा पुल पाडल्यानंतर आम्ही कोथरुडला जाणार कसे ? एनडीए चौकातुन कोथरुड अंडरपासकडे जाण्याचा पर्यायी मार्ग अजून तरी तयार नाही. हा विचार कोण आणि केव्हा करणार ? ''

- कनिका राघवन, विद्यार्थीनी, भुगाव.

""पुल पाडल्यानंतर वारजेहून थेट चांदणी चौकात जाता येणार नाही. त्यामुळे एक-दिड किलोमीटर अलिकडूनच वेदभवन समोरुन, एनडीए चौक येथून मुळशी रस्त्याने महामार्गाला मिळणाऱ्या नव्या रॅम्पने पुढे जावे लागणार आहे, तेथील रस्ता पाहता किमान दोन तास तरी नव्या वाहतुक कोंडीतुन आम्ही सुटू, याची शक्‍यता वाटत नाही.''

- अनिकेत कारला, संगणक अभियंता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT