पुणे

ज्येष्ठ नागरिक पत्रक

CD

महामार्गाची ज्येष्ठ नागरिकांकडून पाहणी
सातारा, ता. १० ः परिसरातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक, व्यावसायिक आणि वैद्यकीय संस्था अशा सुमारे १६ संस्था राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे आणि भरमसाठ टोल दर आकारणीच्या विरोधात आंदोलन छेडण्यासाठी एकत्र आले आहेत. आज राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवा आंदोलनाचे समन्वयक प्रसाद चाफेकर आणि वैद्यकीय संघटनेचे प्रतिनिधी डॉ. अशोक पाटील यांनी समक्ष आनेवाडी टोल नाक्यापर्यंत महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. आगामी काळात होणाऱ्या आंदोलनासाठी गुरुवारी (ता. १३) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. चाफेकर यांनी दिली.

श्री. चाफेकर यांनी पत्रकात म्हटले आहे, महामार्गावरील खड्ड्यांची अतिशय निकृष्ट दर्जाची तात्पुरती मलमपट्टी केलेली आहे. भाकरी थापल्याप्रमाणे हे खड्डे बुजवण्यात आले आहेत. खड्ड्यांऐवजी आता उंचवटे झाले आहेत. सेवा रस्त्यांवरील परिस्थिती अतिशय बिकट आहे. तिथं तर मोठमोठे खड्डे पसरले आहेत. हे खड्डे रात्रीच्या वेळेस अंधारात दुचाकी वाहनचालकांचा जीव घेतील अशा प्रकारचे आहेत. याच सेवा रस्त्यावरून नागरिक महामार्गाकडे येत असतात. त्यामुळे ते गुळगुळीतच असायला हवेत; पण तसे गुळगुळीत रस्ते जनतेसाठी देण्याची मानसिकता ही रस्ते विकास महामंडळाकडे दिसत नाही. त्यांना फक्त महागडी टोल आकारणी हवी आहे.

अनेक ज्येष्ठ नागरिक संघ आणि इतर सामाजिक संस्था तसेच चार्टर्ड अकाउंटंट्‌स असोसिएशन, आयएमए तसेच निमा या दोन वैद्यकीय संघटना यांनी एकत्र येऊन राष्ट्रीय महामार्गावरील टोल दरवाढीविरोधात जनआंदोलन उभारणार आहेत. ज्यांना भरमसाठ टोल दर आकारणी मान्य नाही, अशा सजग नागरिकांनी एकत्र येऊन पाठिंबा द्यावा आणि गुरुवारी (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चाफेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT