पुणे

मलठणमधील दंडवते कुटुंबास मारहाण

CD

कवठे येमाई, ता. ३ : मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या ज्येष्ठ दाम्पत्यासह त्यांच्या कुटुंबीयांना सशस्त्र दरोडेखोरांनी घरात घुसून काठी आणि कोयत्याच्या मुठीने बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (ता. १०) मलठण (ता. शिरूर) येथील दंडवतेदरा परिसरात घडली.
दरोडेखोरांनी यमुनाबाई दंडवते (वय ८०) यांच्या कानातील सोन्याचे कर्णफूल जबरदस्तीने ओरबाडून काढत गळ्यातील मंगळसूत्रही लुटले. या हल्ल्यात तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर मलठण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि कर्णफूल असा ऐवज चोरी गेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलठण-शिक्रापूर रस्त्यालगत दंडवतेदरा येथील दंडवते कुटुंबीय घरात झोपले होते. नामदेव दंडवते आणि त्यांच्या पत्नी इंदुबाई एका खोलीत, तर त्यांचे वडील एकनाथ, आई यमुनाबाई आणि चुलती लहानुबाई हे शेजारील खोलीत झोपले होते. मध्यरात्री एकच्या सुमारास दरवाजाची कडी वाजल्याने यमुनाबाई यांनी दरवाजा उघडला. त्याच क्षणी तोंडाला कापड बांधलेले आणि जर्किन घातलेले तिघे दरोडेखोर घरात शिरले तर त्यांचे इतर साथीदार घराच्या ओट्यावर पहारा देत उभे राहिले. घरात घुसलेल्यांनी यमुनाबाई, एकनाथ आणि लहानुबाई यांना काठीने मारहाण केली. कोयत्याच्या मुठीने यमुनाबाई यांच्या उजव्या हाताच्या दंडावर प्रहार केला व यमुनाबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि उजव्या कानातील सोन्याचे कर्णफूल ओरबाडून घेतले.
याप्रकरणी नामदेव एकनाथ दंडवते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच टाकळी हाजी पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक गोविंद खटिंग आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांची लडाखमधील शाळा बंद करा! प्रशासनाने का पाठवली नोटीस?

Neha Bora: मंदिरातील अत्याचाराच्या वक्तव्यावरुन भाजपचा नेहा बोरांवर जोरदार हल्ला; काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही जाहीर केली नाराजी

Crime News: यूपीतील भाजप नेत्याच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल! व्हिडिओमध्ये कोणावर केले आरोप? 'माझ्या मृत्युला पत्नी...'

Maharashtra Drought Relief: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा! मराठवाड्यातील ४८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची अग्रीम मदत जमा होण्यास सुरुवात

Rahul Gandhi: '२४ तास झाले, आता तरी चर्चेला या!' राहुल गांधींचे मोदींना पुन्हा आव्हान; एपस्टीन प्रकरणही उकरून काढले

SCROLL FOR NEXT