पुणे

वडूज सोन्याची साखळी चोरीचा गुन्हा उघड बातमी

CD

वृद्धाची सोनसाखळी चोरणाऱ्यास अटक

वडूज पोलिसांची कारवाई; सव्वाचार लाखांचा ऐवज केला परत

वडूज, ता. १९ : येथील बसस्थानकातून वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयिताकडून चार लाख २० हजार रुपये किमतीची ३० ग्रॅम वजनाची सोनसाखळी हस्तगत करण्यात आली आहे. गोरख तुकाराम मासाळकर (वय २६, रा. शेवगाव रोड, नाथनगर, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बबन गणपती पळे (वय, ७५, रा. तडवळे, ता. खटाव) हे २१ जून २०२६ रोजी सकाळी तडवळे जाणाऱ्या एसटी बसमध्ये चढत असताना पाठीमागून अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोनसाखळी चोरली होती. याबाबत श्री. पळे यांनी वडूज पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस हवालदार शिवाजी खाडे, गणेश शिरकुळे, अश्विनी घार्गे यांनी बसस्थानक, तसेच शहरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज मिळवून ते वेगवेगळ्या जिल्ह्यांत प्रसारित करून तपास सुरू केला. त्याआधारे संशयिताचे नाव गोरख मासाळकर असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयिताचा पाथर्डी शहरात स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला असता तो तेथील नाथनगर परिसरात आढळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून ३० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हस्तगत करण्यात आली, तसेच आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का? त्याचा पोलिस तपास करीत आहेत. कायदेशीर बाबींची पूर्तता करून पोलिसांनी सोन्याची साखळी श्री. पळे यांना परत केली.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, हवालदार शिवाजी खाडे, गणेश शिरकुळे व अश्विनी घार्गे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
------------------------
00660
वडूज : बबन पळे यांना सोन्याची साखळी परत देताना घनश्याम सोनवणे व पोलिस कर्मचारी.
------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: सिंहगडावर प्रवेशाची नवी पद्धत! ॲपद्वारे पूर्वनोंदणी, गर्दी वाढल्यास प्रवेश बंद, वन विभागाचा मोठा निर्णय

ICC Test Rankings: बुमराह खेळत नसूनही अव्वल, तर ट्रॅव्हिस हेडनं गमावलं पहिल्या क्रमांकाचं सिंहासन! आता कोण झालं 'नंबर वन'?

Shani Gochar 2026: 20 ऑगस्टपासून ‘या’ 3 राशींचं नशीब उघडणार; शनी देणार पैसा, पद आणि प्रतिष्ठा!

Marathi News Live Updates : सीएनजी रिफिलिंग पंपावर ट्रकमध्ये झालेल्या स्फोटात तिघांचा मृत्यू

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवात स्पीकर निर्बंधांवर मंडळांचा आक्षेप! त्रास होणाऱ्यांना मंडळ पैसे द्यायला तयार, कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT