Election  sakal
पुणे

पुणे महापालिकेची प्रभाग रचना जाहीर

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा महापालिका भवनात जाहीर करण्यात आला. मात्र अद्याप ऑनलाइन जाहीर न केल्यामुळे कार्यकर्ते, उमेदवार यांची गैरसोय झालेली आहे. दुपारी दोन नंतर ऑनलाइन आराखडा जाहीर होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरवात झाली आहे. २८ जानेवारी रोजी आयोगाने महापालिकेने तयार केलेला आराखडा मंजूर केल्यानंतर आता तो नागरिकांना हरकती सूचना नोंदविण्यासाठी खुला केला जाणार आहे. त्यामध्ये प्रभागाची चतुःसिमेसह प्रभाग निहाय व एकत्रित असे नकाशेही बघता येणार आहेत.

पुणे महापालिका भवनाच्या विस्तारित इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आज दुपारी सव्वा बाराच्या सुमारास प्रारूप प्रभाग रचना पाहण्याची व्यवस्था केली गेली, तसेच क्षेत्रीय कार्यालय निहाय संबंधित प्रभागांचे स्वतंत्र नकाश उपलब्ध केले आहेत. दरम्यान, काल प्रभागांची नावे लिक झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. त्यामुळे आज ही प्रभाग रचना जाहीर करण्यापूर्वी प्रशासनाने अतिशय गुप्तता ठेवत की बाहेर जाऊ नये यासाठी काळजी घेतली.

महापालिकेच्या संकेतस्थळावरही नकाशे आणि अधिसूचना जाहीर केली जाणार होती, पण दुपारी एक वाजून गेला तरी प्रशासनाने ही माहिती आॅनलाईन टाकली नाही. अधिसूचना पहायला मिळत नसल्याने प्रभागांची सीमा कळणे अवघड झाले आहे.

महत्त्वाचे टप्पे आणि तारीख

  • - प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणे - १ फेब्रुवारी

  • - अधिसूचनेवर हरकती व सूचनांसाठी मुदत - १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी

  • - हरकती व सूचनांचे विवरणपत्र आयोगाला सादर करणे - १६ फेब्रुवारी

  • - हरकती व सूचनांवर सुनावणीसाठी अंतिम मुदत - २६ फेब्रुवारी

  • - सुनावणीनंतर शिफारशींसह विवरणपत्र आयोगाला पाठविणे - २ मार्च

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Accident : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT