Yashwant Sugar Factory sakal
पुणे

Uruli Kanchan News : यशवंत साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध नाहीच! बिनविरोध करण्याचे सर्व प्रयत्न असफल

यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्याचे सर्व प्रयत्न असफल झाले असून ही निवडणुक आता दोन पॅनेलमध्ये रंगणार.

सुवर्णा कांचन

उरुळी कांचन - येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्याचे सर्व प्रयत्न असफल झाले असून ही निवडणुक आता दोन पॅनेलमध्ये रंगणार आहे. या निवडणुकीसाठी येत्या ९ मार्च रोजी मतदान तर १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

शेतकर्‍यांच्या हितासाठी अण्णासाहेब मगर यांनी थेऊर येथे यशवंत सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. महाराष्ट्रात नंबर एक राहिलेला हा कारखाना गेली तेरा वर्षांपूर्वी बंद आहे. कारखान्याच्या संचालक मंडळावर २०१०-११ च्या गळीत हंगामात बरखास्तीची कारवाई झाली. त्यानंतर कारखान्यावर झाल्यानंतर प्रशासकराज होते. काही सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात जाऊन निवडणुकीचा आदेश मिळविला आहे.

तेरा वर्षानंतर होणारी संचालक मंडळाची निवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्वप्रथम गुलमोहर लॉन्स येथे सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत सर्वांनीच ही निवडणुक बिनविरोध करण्याचे आवाहन केले व तसे आश्वासनही दिले. त्यानंतर निवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न झाले. मात्र या प्रयत्नांना अपयश आले.

उमेदवार अर्ज मागे घेण्याची मुदत मंगळवारी होती, ही मुदत संपल्यानंतर एका जागेसाठी एक पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याने निवडणुक बिनविरोध होणार नाही, यावर‌ शिक्कामोर्तब झाले. अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी आणि अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल या दोन पॅनलमध्ये ही निवडणुक रंगणार आहे. निलडणुकीच्या रिंगणात माजी संचालक व प्रमुख उमेदवार उतरले आहेत. या निवडणुकीसाठी आता या निवडणुकीसाठी येत्या ९ मार्च रोजी मतदान तर १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून उपनिबंधक सहकार संस्था, पुणे शहर डॉ. शीतल पाटील या काम पाहणार आहेत.

दरम्यान, पूर्व हवेलीतील प्रत्येक गावातील नेते मंडळी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहेत. लोणी काळभोर गावात सर्वात जास्त १८८७ मतदार असून सर्वात कमी प्रत्येकी १ मतदार मोशी, हिंगणे बुद्रुक, कोंढवे बुद्रुक या तीन गावात आहेत. सध्या सभासद मतदारांचा आकडा अंदाजे चौदा ते पंधरा हजाराच्या आसपास आहे.

निवडणुकीच्या‌ रिंगणात असे आहेत उमेदवार -

अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी -

गट क्र. १ उरुळी कांचन दरेकर सुशांत सुनील (सहजपूर), कांचन संतोष आबासाहेब, कांचन सुनील सुभाष (दोघेही उरुळी कांचन). गट क्र. २ सोरतापवाडी : चौधरी शशिकांत मुरलीधर (सोरतापवाडी), चौधरी विजय किसन (नायगाव), कोलते ताराचंद साहेबराव (कोरेगावमूळ). गट क्र. ३ लोणी काळभोर : अमर उद्धवराव, काळभोर योगेश प्रल्हाद (दोघेही लोणी काळभोर), काळे मोरेश्वर पाडुरंग (थेऊर). गट क्र. ४ फुरसुंगी-मांजरी : हरपळे अमोल प्रल्हाद (फुरसुंगी), घुले राहुल सुभाष (मांजरी बुद्रुक). गट क्र. ५ लोहगाव-केसनंद उद्रे किशोर शंकर (मांजरी खुर्द), गायकवाड रामदास सीताराम (कोलवडी). गट क्र. ६ वाडेबोल्हाई : जगताप सुभाष चंद्रकांत (अष्टापूर), गोते रमेश जगनाथ (बिवरी) उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था प्रतिनिधी : गायकवाड संजय सोपानराव (मुंढवा). अनुसूचित जाती-जमाती : शिंदे दिलीप नाना (वाडेबोल्हाई). महिला राखीव प्रतिनिधी काळभोर हेमा मिलिंद, काळभोर रत्नाबाई माणिक (दोघीही लोणी काळभोर). इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हेत्रे मोहन खंडेराव (सहजपूर), भटक्या जाती-जमाती प्रतिनिधी थोरात कुंडलीक अर्जुन (हिंगणगाव).

अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल -

गट क्र. १ उरुळी कांचन कांचन अजिंक्य महादेव, कांचन अमित भाऊसाहेब (दोघेही उरुळी कांचन), आतकिरे विकास विलास (बोरी भडक), गट क्र. २ सोरतापवाडी चौधरी राजेंद्र रतन (नायगाव), चौधरी मारुती सीताराम (सोरतापवाडी), कानकाटे लोकेश विलास (कोरेगावमूळ), गट क्र. ३ लोणी काळभोर : काळभोर आप्पासाहेब रंगनाथ, काळभोर राहुल मधुकर (दोघेही लोणी काळभोर), काकडे नवनाथ तुकाराम (थेऊर). गट क्र. ४ फुरसुंगी मांजरी बुद्रुक : घुले राजीव शिवाजीराव (मांजरी बुद्रुक), कामठे सुरेश फकीरराव (फुरसुंगी). गट क्र. ५ लोहगाव-केसनंद : उंद्रे रोहिदास दामोदर (मांजरी खुर्द), पवार आनंदा देवराम (कोलवडी). गट क्र. ६ वाडेबोल्हाई : कोतवाल श्यामराव सोपाना (अष्टापूर), गावडे दीपक कुशाबा (वाडेबोल्हाई). उत्पादक सह. संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन 'ब' वर्ग काळभोर सागर अशोक (लोणी काळभोर), महिला राखीव : घुले सुरेखा मधुकर (मांजरी बुद्रुक), काळभोर संगीता सखाराम (लोणी काळभोर). अनुसूचित जाती-जमाती : वेताळ संतोष दत्तात्रय (हिंगणगाव). इतर मागासवर्गीय टिळेकर रोहिदास गोविंद (टिळेकरवाडी), विमुक्त जाती-भटक्या जमाती विमाप्र थोरात मारुती किसन (खामगाव टेक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT