Elections of Gram Panchayats and Co-operative Society Elections adjourned till 20th December pune politics  sakal
पुणे

Pune News : सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित

राज्यातील ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीत होत आहेत. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. या संदर्भात राज्य सरकारच्या सहकार विभागाने आज आदेश जारी केला. राज्य निवडणूक आयोगाने १८ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत राज्यातील ७ हजार ५१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या ग्रामपंचायतीचा निकाल २० डिसेंबर रोजी लागणार आहे. तर, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानेही ७ हजार १४७ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरु आहे. त्यामध्ये ‘अ’ वर्गातील ३८, ‘ब’ वर्गातील १ हजार १७०, ‘क’ वर्गातील ३ हजार १५१ आणि ‘ड’ वर्गातील २ हजार ७८८ सहकारी संस्थांचा समावेश आहे.

ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीत सुरु आहेत. तसेच, ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या सदस्यांची संख्या अधिक आहे. या सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्र एक किंवा अनेक तालुक्यांशी संबंधित असल्यामुळे बरेच मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात. जास्तीत जास्त मतदारांच्या सहभागासाठी सहकारी संस्थांच्या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत स्थगित केल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले.

राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील, त्या टप्प्यापासून २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. मात्र, वर्ग ‘क’, ‘ड’ आणि वर्ग ‘इ’ तसेच न्यायालयाने निवडणूक घेण्याबाबत आदेश दिलेल्या सहकारी संस्था वगळल्या आहेत. पुढील आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील, असे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.

पतसंस्था फेडरेशनची निवडणुकही पुढे

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची निवडणूक सुरू असून, बुधवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस होता. परंतु निवडणूक स्थगित झाल्यामुळे पुढील आदेशानंतरच निवडणुकीबाबत निर्णय होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT