e bike.jpg 
पुणे

एेकलंत का ! आता आपलं पुणं बनणार जगातील सर्वात मोठ इलेक्ट्रिक बाईक वापरणारं शहर

शितल बर्गे

बालेवाडी (पुणे) : पुणे शहरामध्ये वाढते प्रदूषण व वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी व्ही. ट्रो. मोटर्स प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून ग्रीन पुणेसाठी “इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट” हि संकल्पना पुणे शहरामध्ये राबविण्यात येणार असून या इलेक्ट्रिक बाईकने प्रवास करण्यास केवळ कमीत कमी ९० पैसे प्रती कि. पासून जास्तीत जास्त ४ रु प्रती किमी खर्च पुणेकरांना येणार आहे. तरी सदर प्रकल्प राबविण्यासाठी एका ठिकाणी १० बाईक चार्ज होतील असे मुख्य रस्त्यावर एक चार्जींग स्टेशन अशा प्रकारचे पुणे शहराच्या विविध भागामध्ये मुख्य रस्त्यांवर ५०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यास मान्यता आज पुणे शहर सुधारणा समिती मध्ये देण्यात आली.


या प्रकल्पामुळे भविष्यात पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असून एकूणच शहरातील वाहतूक कोंडी, प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. महत्वाचे म्हणजे सदर प्रकल्पासाठी पुणे महापालिकेला कोणतीही आर्थिक गुंतवणूक करायची नाही. सदर प्रकल्प यशस्वी करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी व पुणे मेट्रोचे सुध्दा सहकार्य मिळणार आहे, अशी माहिती पुणे शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष, नगरसेवकअमोल बालवडकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

Chhatrapati Sambhajinagar News : वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या मराठवाड्यातील 22 अधिकाऱ्यांची एकाच दिवशी उचलबांगडी; मक्तेदारी अखेर मोडीत

Khadakwasala Dam Water : पाण्याने गाठला १० वर्षातील तळ! पवना, वरसगाव, पानशेत धरणांचा दिलासा पण खडकवासल्याचं काय?

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

उकळलेला चहा प्यायल्यानंतर १२वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, वडिलांचे शाळा व्यवस्थापनावर आरोप; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT