electric cable broke kothrud shivajinagar water supply stall Sakal
पुणे

Pune News : विद्युत वाहिनी तुटल्याने कोथरूड शिवाजीनगरचा पाणी पुरवठा ठप्प

खडकवासला येथे झालेल्या अपघातामध्ये वीज पुरवठा करणार्या वीजेच्या खांबाचे नुकसान झाल्याने जॅकवेलला होणारा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खडकवासला येथे झालेल्या अपघातामध्ये वीज पुरवठा करणार्या वीजेच्या खांबाचे नुकसान झाल्याने जॅकवेलला होणारा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे शिवाजीनगर, चतु:श्रृंगी, बाणेर आदी भागातील पाणी पुरवठा बंद झाला आहे.

आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास अपघात झाल्यानंतर विद्युत पुरवठा यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाणीपुरवठा खंडित झाला आहे. महापालिकेतर्फे तातडीने या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत वारजे जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीत संपूर्ण कोथरूड परिसर, वारजे माळवाडी परिसर, बाणेर, बालेवाडी, बावधन व पाषाण परिसर, कर्वे रस्ता, चतु:श्रृंगी, औंध, गणेश खिंड,

शिवाजीनगर, गोखले नगर, प्रभात रोड इत्यादी भागातील पाणीपुरवठा बंद आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीत सिंहगड रस्ता परिसर, लष्कर जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीत रामटेकडी, हडपसर, मुंढवा, वानवडी, संपूर्ण कोंढवा, खराडी,कॅम्प, येरवडा व खडकी येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून कमी दाबाने होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Beed Train: पुणे-बीड प्रवास आता सात तासांत; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज रेल्वेसेवेचा प्रारंभ; असे आहे वेळापत्रक

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Ganpati Panchayatan Sansthan Sangli : ‘किमान दोघांना लोळवण्याची ताकद’; अभिनेत्री भाग्यश्रीच्या पूजेवर विजयसिंह राजे संतापले

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Aaditya Thackeray: दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंचे मौन सुटले; म्हणाले, ‘मी त्यांना कधीही भेटलेलो नाही’

SCROLL FOR NEXT