दिवाळी निमित्त सिंहगडावर विद्युत रोषणाई
दिवाळी निमित्त सिंहगडावर विद्युत रोषणाई sakal
पुणे

दिवाळी निमित्त सिंहगडावर विद्युत रोषणाई

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : दिवाळीनिमित्त सिंहगडावर विद्युत रोषणाई करून नरवीरांना अभिवादनकरून दिवाळीची सुरुवात करण्यात आली. गडकिल्ले संवर्धन संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

सिंहगडावर गडकिल्ले संवर्धन संस्थेच्या वतीने दरवर्षी वासुबारसेच्या दिवशी दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. करण्यात येते. यंदा किल्ल्यावरील पुणे दरवाजा आणि वास्तूंवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दरवाजांवर फुलांची तोरणे बांधून शिवरायांच्या पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढली. फुलांची उधळण, जय जिजाऊ जय शिवराय या जयघोषात शिवरायांना मानवंदना देण्यात आली. गडकिल्ले संवर्धन संस्थेचे संस्थापक साईनाथ जोशी, पैगंबर शेख यांनी आयोजन केले होते.

यावेळी गडकिल्ले संवर्धन चळवळीत काम करणाऱ्या विविध संघटना,सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतील 'ज्योत्याजी केसरकर' यांची भुमिका साकारणारे गणेश लोणारे, बाळूमामाच्या नावानं चांगभल सिरयल मधील 'लक्ष्मी' म्हणजेच पुनम भागवत हे कलाकार उपस्थित होते.

कार्यक्रमास नगरसेवक सचिन दोडके, माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे, शिवभक्त शाम शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य दत्ता जोरकर, माजी नगरसेवक किरण बारटक्के, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सुधाकर गायकवाड, विरेश शितोळे, स्वीकृत सदस्य सचिन दांगट, शिवसेनेचे विधानसभा प्रमुख नितीन वाघ, माजी सरपंच विश्वनाथ मुजूमले, माजी उपसरपंच सुशांत खिरीड, अमोल पढेर, सागर जावळकर, पराग ढेणे गौरव दांगट, आलम पठाण, निलेश बोडके, सुधीर धावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

Planet Nine : नेपच्यूनच्या पलीकडे असू शकतो आणखी एक ग्रह; आतापर्यंत राहिला होता लपून.. शास्त्रज्ञांना मिळाले नवे पुरावे!

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

SCROLL FOR NEXT