Charging Station News esakal
पुणे

Pune News : कराराला ठेंगा पण जागा शोधण्यासाठी ठेकेदाराला अधिकारी घालताहेत पायघड्या

शहरातील इ-वाहनांची संख्या वाढत असल्याने या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची सुविधा आवश्‍यक आहे.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी महापालिकेने ८२ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी व चालविण्यासाठीचा प्रस्ताव मान्य केला, त्यास लगेच वर्कऑर्डर दिली. पण चार महिने उलटून गेले तरीही महापालिका प्रशासनाने ठेकेदारासोबत करार केलेला नाही, २५ लाख रुपायांची बँक गॅरंटी जमा केलेली नाही. तरी देखील महापालिकेचे अधिकारी ठेकेदाराला पायघड्या घालून त्यांच्या सोईच्या जागा शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

शहरातील इ वाहनांची संख्या वाढत असल्याने या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची सुविधा आवश्‍यक आहे. इ वाहनांमुळे ध्वनी व हवा प्रदूषण होत नसल्याने महापालिकेतर्फे इ वाहनांना प्रोत्साहन दिले जाते. त्यासाठी उद्यान, क्षेत्रीय कार्यालय, नाट्यगृह, रुग्णालय, वाहनतळ येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी निविदा काढण्यात आली होती.

या निविदेमध्ये संबंधित कंपनीला मोक्याच्या जागा आठ वर्षासाठी मोफत वापरता येतील. त्यांना जो काही नफा होइल त्यापैकी ५० टक्के हिस्सा महापालिकेचा असणार आहे. चार्जिंगसाठी यंत्रसामग्री, मोबाईल ॲप्लिकेशन, वीज मीटर घेणे, त्याचे संपूर्ण बिल भरणे, एकूण चार्जिंग स्टेशनपैकी ९५ टक्के स्टेशन सुरू ठेवणे आवश्‍यक आहे.

महापालिकेकडे २५ लाख रुपये बँक गॅरंटी देणे यासह इतर अटी वर्क ऑर्डरमध्ये आहेत. पण ठेकेदाराने नियमाचे पालन करावे याकडे महापालिकेचे अधिकारीच दुर्लक्ष करत आहेत.

अशी आहे सध्याची स्थिती

- चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी १६ मे २०२३ रोजी वर्कऑर्डर देण्यात आली

- आठ दिवसात कायदेशीर व कागदपत्रांची पूर्णता करणे आवश्‍यक होते.

- चार महिने उलटून गेले तरीही महापालिकेने ठेकेदारासोबत करार केलेला नाही

- ठेकेदाराने २५ लाख रुपयांची बँक गॅरंटी भरलेली नाही

- चार्जिंगसाठी प्रति युनिटचा दर ठरलेला नाही

- कायदेशीर व महापालिकेच्या दृष्टीने आवश्‍यक गोष्टींची पूर्तता न करता ठेकेदारासाठी जागांचा शोध सुरु

- निविदा काढताना अन्य विभागांना विश्‍वासात न घेतल्याने आता विद्युत विभाग, ठेकेदाराचे लोक विभाग प्रमुखांची घेऊन जागा मागत आहेत.

- ठेकेदारास वीज जोड मिळत नसल्याने महापालिकेतर्फे वीज देण्याचा खटाटोप सुरु, पण यामुळे नियमाचे उल्लंघन होण्याची शक्यता

‘शहरात ८२ ठिकाणी ठेकेदारामार्फत चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत, पण अद्याप ठेकेदार करार करून घेण्यासाठी आलेला नाही. त्यांनी बँग गॅरंटीही भरलेली नाही, तसेच चार्जिंगचे दर ठरलेले नाहीत. ठेकेदाराला अद्याप वीज जोड मिळालेला नाही, काही ठिकाणी आम्ही वीज देऊन चार्जिंग स्टेशन लवकरच सुरु करण्याचा प्रयत्न आहे.’

- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

या प्रश्‍नाचे उत्तर नाही

मुख्य अभियंता कंदूल यांनी करार करून घेण्यासाठी ठेकेदार येत नाही, बँक गॅरंटी भरत नाही असे सांगत असताना दुसरीकडे चार्जिंग स्टेशनसाठी जागा शोधण्यासाठी अधिकारी व ठेकेदाराने नियुक्त केलेले कर्मचारी एकत्र कसे काय फिरत आहेत असे विचारले. पण त्याचे उत्तर कंदूल यांच्याकडे नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT