Baramati Rain sakal
पुणे

Baramati News : खंडीत सेवांनी व मुसळधार पावसाने बारामतीकरांची त्रेधातिरपीट

खंडीत वीजपुरवठ्याने आज बारामतीकर नागरिक झाले हैराण.

मिलिंद संगई,

बारामती - खंडीत वीजपुरवठ्याने आज बारामतीत नागरिक हैराण झाले. दैनंदिन देखभाल व दुरुस्तीसाठी महावितरणकडून सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत शहराच्या मुख्य भागातील वीजपुरवठा खंडीत ठेवण्यात आला होता. खंडीत वीजपुरवठा, इंटरनेटमध्ये येणारा अडथळा, मोबाईल नेटवर्कमधील अडचणी व त्यातच आलेला मुसळधार पाऊस या सर्वांमुळे बारामतीकर हैराण झाले होते.

दुपारी दोन नंतर काही काळासाठी वीजपुरवठा सुरळीत झाला पण त्या नंतर पुन्हा वीजपुरवठा खंडीत झाला. त्यातच मुसळधार पावसाने बारामतीला झोडपून काढल्याने दुपारी चारपर्यंत वीजपुरवठा विस्कळीतच होता.

महावितरणकडून वीजपुरवठा खंडीत करण्याबाबत पूर्वसूचना देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात दुपारी दोन पर्यंतच वीजपुरवठा खंडीत होण्याची ती सूचना होती. प्रत्यक्षात सात तासांहून अधिक वीजपुरवठा खंडीत राहिल्याने बारामतीचे जनजीवन विस्कळीत झाले होते.

काल काही कंपन्यांची इंटरनेट सेवा विस्कळीत असल्याने तर आज वीजपुरवठा खंडीत झाल्याने कामकाजावर परिणाम झाला. आज दिवसभर अनेक कंपन्यांच्या मोबाईलचे नेटवर्क गायब झाल्याने अनेकांना एकमेकांशी संपर्क साधण्यात अडचणी आल्या.

त्यातच मुसळधार पावसाने आज दुपारी चार नंतर बारामतीच्या जनजीवनावर देखील परिणाम झाला होता. अचानकच पावसाने हजेरी लावल्याने अनेक जण चिंब भिजून गेले होते. कोणतीही पूर्वतयारी न करता घराबाहेर पडलेल्यांना भिजण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता. मुसळधार पावसासह वेगाने वाहणारे वारे व ढगांच्या गडगडाटाने पावसाळी वातावरण तयार झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT