electricity meter
electricity meter 
पुणे

वीजमीटर मिळालेत मग आता तातडीने वीजजोडण्या द्या; संचालकांनी दिले आदेश

सकाळवृत्तसेवा

पुणे - मंडल कार्यालयांना मुबलक प्रमाणात वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे पेडपेडींग (पैसे भरलेले, परंतु अद्याप वीजजोड न दिलेले) असलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजजोडण्या येत्या आठवड्याभरात कार्यान्वित करा,' अशा सूचना पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिल्या. तर अकृषक वितरण रोहित्राच्या नादुरुस्तीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी "बिघाड विरहित अकृषक रोहित्र अभियान' राबवा, असेही ते म्हणाले. 

पुणे, बारामती व कोल्हापूर परिमंडलातील विविध योजना व कामांची आढावा बैठक नाळे यांनी हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. मुख्य अभियंता सुनील पावडे , सचिन तालेवार, अंकुर कावळे उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी नाळे म्हणाले,' पुणे प्रादेशिक विभागामध्ये सर्व मंडल कार्यालयांना मुबलक प्रमाणात वीजमीटर देण्यात आले आहे. त्यामुळे वेगळी वीजयंत्रणा उभारण्याची गरज नाही, अशा सर्व वीजजोडण्या येत्या आठवड्याभरात कार्यान्वित कराव्यात. ज्या वीजजोडण्यांसाठी नवीन वीजयंत्रणा उभारणे आवश्‍यक आहे, त्याचे काम देखील ताबडतोब करण्यात यावे. तसेच उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) व मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील मंजूर वीजजोडण्या येत्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करावे.' 

शहरी व ग्रामीण भागामध्ये अकृषक वितरण रोहित्रांच्या नादुरुस्तीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी पुणे प्रादेशिक विभागात "बिघाड विरहित अकृषक रोहित्र अभियान' राबविण्यात यावे.. त्यानुसार संबंधित कंत्राटदारांकडून सर्व वितरण रोहित्रांची देखभाल व दुरुस्तीची कामे वेगाने करण्यात यावी. रोहित्र अतिभारित असल्याचे दिसून आल्यास त्याची क्षमतावाढ करण्यात यावी. यानंतरही अकृषक वितरण रोहित्र नादुरुस्त झाल्यास त्याच्या कारणमिमांसेत दोषी आढळलेल्या संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, असेही नाळे म्हणाले. 

कोविड रुग्णालयांना पर्यायी वीजपुरवठ्याची सोय 
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सर्व कोविड-19 रुग्णालयांना महावितरणकडून पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध करून ठेवावी. सोबतच या रुग्णालयांतील स्वयंचलित जनरेटर (डीजी सेट) देखील सुस्थितीत असल्याची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित महापालिकांचे विद्युत विभाग यांच्या समन्वयातून करण्यात यावी, असेही नाळे यांनी यावेळी सांगितले. 

मोठ्या सोसायट्यांना अखंडित वीजपुरवठा 
शहरी भागातील मोठ्या गृहनिर्माण सहकारी सोसायट्या, व्यापारी संकुलांना देखील वीज खंडित झाल्यास पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. त्यासाठी मोठा निधी लागणार असल्यास त्याबाबतचा आराखडा तयार करण्यात यावा तर कमी खर्चाची कामे देखभाल व दुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात यावेत,, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT