Electricity 
पुणे

वारंवार ट्रिप....पिंपळे सौदागरवासिय त्रस्त

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - लॉकडाउन अन्‌ त्यात वारंवार वीजेचं ट्रिप होणं यामुळे पिंपळे सौदागरवासिय चांगलेच त्रस्त झाले आहेत. चक्क महावितरणाच्या हेल्पलाइन क्रमांकावर विजेची तक्रार केली असता रिंग वाजून कॉल आपोआप कट होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. महावितरण प्रशासनाची हेल्पलाइन नंबरला प्रतिसाद न देण्याची ही जुनीच शक्कल लॉकडाउनमध्ये नव्याने पुन्हा वापरत असल्याने नागरिक पुरते हैराण झाले आहेत.

पिंपळे सौदागरमध्ये कोकणे चौक, गोविंद गार्डन, शिवार चौक, सेव्हन हिल व मिलेनियम सोसायटी परिसरात वारंवार वीज खंडित होत आहे. बरेच जण या परिसरात वर्क फ्रॉम होम करणारे आहेत. त्यांच्या कामाचाही खोळंबा होत आहे. घरबसल्या नागरिकांना मनोरंजनासाठी इतर कोणतेही पर्याय उरलेले नाहीत. त्यामुळे नागरिक वीज गेल्यास हवालदिल होत आहेत. 24 एप्रिलला रात्री दहा वाजता बत्ती गुल झाली ती रात्री दोन वाजता आली. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता वीज गायब झाली. या परिसरात वारंवार असे प्रकार घडत आहेत.

या भागातील भूमिगत केबलमध्ये वारंवार बिघाड होत आहे. नादुरुस्त केबल दुरुस्त करून काम मार्गी लावले जात आहे. सध्या तरी येथील वीज पुरवठा सुरळीत झाल्याचे महावितरणचे अभियंता जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress High Command Alert : काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय! सर्व आमदार-खासदारांना तातडीने दिल्लीला बोलावले...

Ranji Trophy 2026: ठरलं तर मग ! उद्यापासून रणजी ट्रॉफीचा थरार सुरू; ३८ संघांमध्ये चुरस, तुमच्या आवडीच्या टीमचा सामना कधी? वाचा संपूर्ण शेड्युल!

Marathi News Live Updates : पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनबाहेर CJP कार्यकर्त्यांचं आंदोलन

सोनाली बेंद्रेला 'अगं बाई अरेच्चा!' या चित्रपटातील 'छम छम' गाण्यासाठी किती पैसे मिळाले? म्हणाली, 'केदार शिंदेने...'

Kaygaon News : गंगापूर तालुक्यावर दुष्काळाचे सावट! चारा छावण्यांसाठी प्रशासनाची धावपळ; शेतकऱ्यांचे लक्ष प्रत्यक्ष मदतीकडे

SCROLL FOR NEXT