पुणे, ता. ११ : महावितरणने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून गेल्या तीन महिन्यांत राज्यात ६६ कोटी २८ लाख रुपयांच्या २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. १९० भरारी पथकांच्या मदतीने ही धडक मोहीम राबवण्यात आली असून, २८९ प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणने आता ‘मशिन लर्निंग’वर आधारित हायटेक मोड्यूल विकसित केले आहे. ग्राहकांचा वीज वापराचा जुना आलेख, अचानक झालेला बदल आणि ५० हून अधिक तांत्रिक निकषांचे हे मोड्यूल २४ तास विश्लेषण करते. शंकास्पद वापर आढळल्यास संबंधित ग्राहकाला ‘हाय-रिस्क’ श्रेणीत टाकून थेट कारवाई केली जात आहे.
या मोहिमेत पारदर्शकता आणण्यासाठी ‘थेफ्ट ट्रॅकिंग ॲंड मॉनिटरिंग सिस्टीम’ आणि स्वतंत्र मोबाइल ॲपचा वापर केला जात आहे. याद्वारे तपासणीचे लाइव्ह फोटो, डिजिटल पंचनामा आणि दंडात्मक वसुलीची माहिती रिअल-टाइम अपडेट केली जाते. जून ते ऑगस्टदरम्यान कोकण विभागात ११ हजार ८३, नागपूर विभागात ५ हजार ९४९, पुणे विभागात ५ हजार ८४९ आणि छत्रपती संभाजीनगर विभागात ५ हजार ८३ अशा एकूण २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड केल्या आहेत. त्यातील २४ हजार ५०८ वीजचोऱ्यांच्या मूल्यांकनातून ६६ कोटी २८ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत वीजचोरीच्या बिलांपोटी १० हजार ८१० प्रकरणांत २९ कोटी ८५ लाख रुपयांचा भरणा झाला आहे. दंड न भरणाऱ्या २८९ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केल्याचे महावितरणने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.